शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारखान्यांवर जप्ती

By admin | Updated: January 23, 2016 02:32 IST

आदेश देऊनही गेल्यावर्षीची थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने राज्यातील दोन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर आयुक्त

पुणे : आदेश देऊनही गेल्यावर्षीची थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने राज्यातील दोन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. सोलापूरमधील स्वामी समर्थ कारखाना आणि बीडमधील जय भवानी कारखान्यावर ही जप्ती आणली गेली आहे. या दोन्ही कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केलेला नाही.गेल्या वर्षी २०१४-१५ या वर्षात राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही, अशा कारखान्यांवर कडक कारवाईचे सुतोवाच आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार यंदा गाळीप हंगाम सुरू न केलेल्या पण गेल्या वर्षीची एफआरपी थकवलेल्या कारखान्यांना ही रक्कम ठराविक काळात भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्या कालावधीत रक्कम न भरल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोलापूरमधील स्वामी समर्थ कारखाना आणि बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील जय भवानी कारखान्यांवर जप्तीचे आदेश आयुक्तांनी दिले.स्वामी समर्थ कारखान्याकडे ९ कोटी ७ लाख रुपयांची थकबाकी आहे तर जय भवानी कारखान्याकडे ४ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या संदर्भातील आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना केले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या कारखान्यांकडील साखर आणि इतर मालमत्ता यांचा जाहीर लिलाव करून त्यातून मिळणारे थकबाकीचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील, अशी माहिती सहायक संचालक शरीफ शेख यांनी दिली.या दोन कारखान्यांबरोबर आणखी पाच कारखान्यांवरही जप्तीची टांगती तलवार आहे. यामध्ये परभणीतील रत्नप्रभा कारखाना, उस्मानाबादमधील भीमाशंकर कारखाना, नांदेडमधील भाऊराव चव्हाण कारखाना, नाशिकमधील के. के. वाघ कारखाना आणि यवतमाळमधील वसंत पुसद कारखान्याचा समावेश आहे.रत्नप्रभा, भीमाशंकर व भाऊराव चव्हाण या कारखान्यांची या संदर्भातील शेवटची सुनावणी २८ जानेवारीला होणार आहे. तर के. के. वाघ कारखान्याची अंतिम सुनावणी ३० जानेवारी आणि वसंत पुसद कारखान्याची अंतिम सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत ही थकबाकी न भरल्यास त्यांच्यावरही जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व कारखान्यांनी या हंगामात गाळप सुरू केलेले नाही. (प्रतिनिधी)