पुणो : एकटय़ा पुणो जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत मराठी चित्रपटांना तब्बल सात कोटी दोन लाख रुपयांची कर सवलत देण्यात आली आहे. यामुळे प्रथमच चित्रपटांपेक्षा केबल आणि डीटीएची कर वसुली वाढली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात 74 कोटी 22 लाख रुपयांची करमणूक कर वसूल करण्यात आला आहे.
शासनाने यंदा करमणूक कर विभागाला 16क् कोटींचे कर वसुलीचे उद्दिष्ट दिले असून, ऑक्टोबरअखेर 74 कोटी 22 लाखांचा कर वसूल झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने 28 कोटी 31 लाख रुपये चित्रपट आणि 41 कोटी 62 लाख रुपये केबल आणि डीटीएचच्या ग्राहकांकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)
मल्टिप्लेक्सनी 67 कोटींचा कर बुडविला
शासनाने पुणो शहर आणि जिल्ह्यातील 1क् मल्टिप्लेक्सला दिलेल्या करसवलतीपैकी 8 मल्टिप्लेक्सची कर सवलत बंद करण्यात आली आहे. यामध्ये शासनाकडून मल्टिप्लेक्स सुरू झाल्यानंतर पहिले तीन वर्षे संपूर्ण कर सवलत व नंतरचे दोन वर्षे 75 टक्के कर सवलत देण्यात येते. शासनाच्या याच नियमाचा फायदा घेऊन शहरातील काही प्रमुख मल्टिप्लेक्सने शासनाचा सुमारे 67 कोटी रुपयांचा कर बुडविला आहे. सध्या याबाबत शासनस्तरावर सुनावणी सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कर सवलत बंद केलेले मल्टिप्लेक्स
गोल्ड अॅडलॅब्स, आयनॉक्स, इ-स्क्वेअर, जय-गणोश फेम, बीग सिनेमा, मंगला, सीटी प्राईट-सातारा रोड, सीटी प्राईट-कोथरूड.
शासनाच्या वतीने मराठी चित्रपटांना करमणूक करातून सूट देण्यात आली आहे. यामुळेच गेल्या सहा महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना एकटय़ा पुणो जिल्ह्यात तब्बल सात कोटी दोन लाख रुपयांची कर सवलत दिली आहे.
- मोहिनी चव्हाण,
जिल्हा करमणूक कर अधिकारी