शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय प्रणाली, अ‍ॅपमुळे कोरोना लसीकरणास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम १६ जानेवारीपासून सुरू झाले असले तरी, लसीकरणाकरिता तयार केलेल्या संगणकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम १६ जानेवारीपासून सुरू झाले असले तरी, लसीकरणाकरिता तयार केलेल्या संगणकीय प्रणालीमुळे व ‘को-विन अ‍ॅप’मधील तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणास उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत.

शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना ही लस दिली जाणार आहे़ त्यानुसार पुणे महापालिका हद्दीत शासकीय व खाजगी संस्थांमधील सुमारे ५६ हजार सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नावनोंदणी केली आहे़ या सर्वांची नावे संगणकीय प्रणालीे व ‘को-विन अ‍ॅप’ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे़ मात्र या प्रणालीमुळे दिवसाला एका केंद्रावर शंभर अशाप्रमाणेच नोंदणी केलेल्या सेवकांची नावे येत आहेत़ त्यातच या प्रणालीमुळे वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने संबंधित लाभार्थ्यांना वेळेत लसीकरणाचा एसएमएस न जाण्याचे प्रकारही घडत आहेत़ या सर्व घटकांचा परिणाम शहरातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणावर होत आहे़

१६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली़ परंतु, पहिल्या दिवशी पुणे शहरात सर्वाधिक कमी लसीकरण झाल्याची नोंद घेतली गेली़ लसीकरणासाठी केंद्रांची उभारणी केली गेली तरी, त्या केंद्रावर ज्या आरोग्यसेवकांना लस देण्यात येणार आहे, त्या सेवकांपर्यंत या संगणक प्रणालीतून एसएमएस वेळेत गेले नसल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे़

अनेक समस्या समोर

ज्यांची नावे त्या दिवसाच्या शंभर जणांच्या यादीत आहेत, त्यापैकी काही

आरोग्यसेवक आदल्या दिवशी रात्रपाळीला कामावर असतात, अथवा एक दिवसापूर्वीच पूर्वकल्पना नसल्याने काही जण बाहेर गावीही गेलेले असतात़ तसेच ज्यांची नावे आहेत, त्यांना कोरोनाची लागण होऊन कोरोनामुक्त झाल्याच्या दिवसांत अद्याप दोन महिने पूर्ण झाले नाहीत़ अशा विविध समस्या सध्या समोर येत आहे़

---------------------------