शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

संगणक परिचालक शासन सेवेपासून वंचितच

By admin | Updated: December 10, 2015 01:17 IST

राज्यातील संग्राम प्रकल्पातील जवळपास २७०० संगणक परिचालक हे शासनाच्या सेवेपासून वंचित आहेत. या संगणक परिचालकांना न्याय मिळून पदनिश्चित करून शासन सेवेत कायमस्वरूपी घेण्यात यावे

खोर : राज्यातील संग्राम प्रकल्पातील जवळपास २७०० संगणक परिचालक हे शासनाच्या सेवेपासून वंचित आहेत. या संगणक परिचालकांना न्याय मिळून पदनिश्चित करून शासन सेवेत कायमस्वरूपी घेण्यात यावे, अशा प्रकारची मागणी दौंड तालुका संगणक परिचालकचे अध्यक्ष अभिजित खळदकर यांनी केली आहे. नोव्हेंबर २0११ पासून महाराष्ट्र राज्यात ई-पंचायत, संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम), हा प्रकल्प चालू आहे. या प्रकल्पाच्या कामाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने महाआॅनलाईन कंपनीला दिलेले होते. त्यानुसार या कंपनीमार्फत ग्रामपंचायत स्तरावर एका संगणक परिचालकाची नेमणूक मानधन तत्त्वावर ३0 एप्रिल २0११ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली. त्यात प्रतिमहिना ८00 मानधन संगणक परिचालक व साहित्य खरेदीसाठी असल्याचे नमूद केले. मुळात संगणक परिचालक हा ग्रामीण भागातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे आणि त्याच्यावरतीच त्याच्या कुटुंबीयाची पूर्ण जबाबदारी असल्यामुळे या तुटपुंज्या मानधनावर चांगले काम करूनसुद्धा जगणे मुश्कील झाले आहे. राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली. त्यात कामबंद आंदोलन करून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर ११ डिसेंबर २0१४ रोजी मोर्चा काढून त्यात शासन सेवेत घेणे व मासिक वेतन १५ हजार देणे, कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना सेवेत परत घेणे. या मागण्या शासन दरबारी ठेवून १0 दिवसांत धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असे लेखी आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला होता. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.डिजिटल इंडिया व डिजिटल महाराष्ट्र साकार करून जनतेला आॅनलाईन सेवा देणाऱ्या संग्राम प्रकल्पातील संगणक परिचालकांना पद निश्चित करून जिल्हा परिषदेच्या शासन सेवेत घेण्यासाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार राहुल कुल यांना दिलेल्या निवेदनावर उपाध्यक्ष नितीन लडकत, संदीप येडे, सचिन मोरे, तसेच देऊळगावगाडाचे माजी सरपंच डी. डी. बारवकर यांच्या सह्या आहेत.