शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करा!

By admin | Updated: April 6, 2016 01:30 IST

पहिल्या टप्प्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत घेतलेल्या २00 गावांपैकी १३0 गावांत १00 टक्के कामे झाली आहेत. ७0 गावांत कामे अपूर्ण असून

पुणे : पहिल्या टप्प्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत घेतलेल्या २00 गावांपैकी १३0 गावांत १00 टक्के कामे झाली आहेत. ७0 गावांत कामे अपूर्ण असून, ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जलयुक्त शिवार योजनेचा सोमवारी जिल्हा परिषदेत झालेल्या बैैठकीत आढावा घेण्यात आला. त्या वेळी राव यांनी वरील सूचना दिल्या. या योजनेतून पहिल्या टप्प्यात भोर १२, वेल्हे ११, मुळशी १३, मावळ १५, हवेली १८, खेड १५, आंबेगाव ११, शिरूर १६, जुन्नर १५, बारामती१६, पुरंदर २२, दौैंड २१ व इंदापूर १५ अशी २00 गावांची निवड झाली होती. या गावांत कपार्टमेंट बिडिंग, सलग समतलचर, माती नाला बांध, अनगड दगडी बांध, गॅबियन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर, माती नाला बांध दुरुस्ती, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट बंधारा दुरुस्ती, नाला गोलीकरण व रुंदीकरण, पाझर तलाव व दुरुस्ती, के.टी. वेअर व दुरुस्ती, कालवा दुरुस्त, सिंचन विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पुनभर््ारण चर,रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे, मजगी, वनतळे, वळण बंधारा अशी ७१११ कामे हाती घेण्यात आली होती. यासाठी २४१.८६ कोटींचा आराखडा तयार केला होता. यातील ५ हजार १३ कामे पूर्ण झाली असून, यातील १२१ कोटींचा निधी यावर खर्च झाला आहे. २ हजार ९८ कामे अद्याप सुरू आहेत. गेल्या पावसाळ्यापूर्वी झालेल्या कामातून ३00७२.२५ दलघमी पाणीसाठा होऊन २८८४३.५ एवढे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले होते. सध्या जिल्ह्यात ७९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जलयुक्तच्या कामांमुळे ३0 ते ४0 टँकर वाचले आहेत; अन्यथा आज टँकरची संख्या २00 पेक्षा अधिक झाली असती. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित कामांसाठी ७ जूूनची डेडलाइन दिली आहे. जर ही कामे झाली, तर पुढील वर्षात आणखी टँकर कमी होण्यास मदत होईल.