शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रीकरण लवकर पूर्ण करा; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नागराज मंजूळे यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 12:06 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील मैदानाच्या काही भागांवर काही महिन्यांपासून सुरू असलेले चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिग्दर्शक नागराज मंजूळे यांना देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देमंजूळे हे फुटबॉलशी संबंधित विषयावर बनवत आहेत हिंदी चित्रपट४५ दिवसांसाठी दिले होते मैदान, पण १२० दिवस उलटूनही चित्रीकरण पूर्ण नाही

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील मैदानाच्या काही भागांवर काही महिन्यांपासून सुरू असलेले चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिग्दर्शक नागराज मंजूळे यांना देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेते मंजूळे हे फुटबॉलशी संबंधित विषयावर हिंदी चित्रपट बनवत आहेत. त्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचीही भूमिका असणार आहे. त्याच्या चित्रीकरणासाठी मंजूळे यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागांची परवानगी मागितली होती. हा चित्रपट खेळावर आधारित असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला होता व त्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र, हे चित्रीकरण काही कारणामुळे लांबले. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने मंजूळे यांना चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंजूळे यांनीही ते मान्य केले आहे. त्यांनी चित्रीकरणासाठी मैदान वापरण्याचा कालावधी वाढवून मिळावा, अशी विनंती केली होती. हा विषय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत ठेवण्यात आला होता. परिषदेने त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यापीठाने केवळ ४५ दिवसांसाठी आणि पूर्वपरिस्थितीत करण्याच्या अटीवर साडेसहा लाख रुपये भाडे आकारून मैदान चित्रीकरणासाठी दिले होते. पण १२० दिवस उलटूनही चित्रीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पूर्ण मैदान उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच जिल्हा प्रशासनानेही त्यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, संबंधितांकडून पूर्ण १२० दिवसांचे भाडे वसूल करण्यात यावे व ही रक्कम विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान लवकारात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठाकडे करण्यात आली. या वेळी  अध्यक्ष ऋषी परदेशी, जितेंद्र राठोड, सवेंदु शिंदे, विक्रम जाधव, विशाल मोरे, राज पाटील, रवी अमरावती, प्रतीक कांबळे, यश कांबळे उपस्थित होते.

कधी संपणार चित्रीकरण?विद्यापीठाने मान्यता न घेता मैदान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिल्याचे दिसून येत आहे. याबाबत शहर तहसील कार्यालयाने ठपका ठेवला असून कारवाईबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभागानेही याबाबत चौकशी सुरू केली असून विद्यापीठाकडून अहवाल मागविला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने चित्रीकरण लवकर करण्याची सूचना मंजूळे यांना दिली आहे. मात्र, नेमका हा कालावधी किती असेल, हे विद्यापीठाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे चित्रीकरण आणखी किती दिवस चालणार, हे गुलदस्त्यातच राहणार आहे. 

चित्रीकरण थांबवावेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेले चित्रपटाचे चित्रीकरण तातडीने थांबवून विद्यार्थ्यांसाठी मैदान खुले करून द्यावे, अशी मागणी भीम आर्मी संघटनेने विद्यापीठाकडे केली आहे. विद्यापीठाकडून मैदानासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जाते. असे असूनही चित्रीकरणासाठी मैदान उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे बेकायदेशीरपणे मोठ्या कालावधीसाठी मैदान देऊ नये, अशी मागणी संघटनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांनी केली.

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेAmitabh Bachchanअमिताभ बच्चनPune universityपुणे विद्यापीठ