शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरुणीच्या अपहरणाची तक्रार

By admin | Updated: July 27, 2016 03:55 IST

एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनुसार तिघां जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती : एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनुसार तिघां जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. बारामती शहरातील जळोची उपनगरातील सुवर्णयुग रेसिडन्सी या इमारतीमध्ये त्या राहतात. आरोपीदेखील त्याच इमारतीमध्ये रहिवासी आहेत. आरोपी किरण अशोक माळवदकर, अशोक नामदेव माळवदकर, अक्षय अशोक माळवदकर या तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१४ जून २०१६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास बेपत्ता तरुणीला मैत्रिणीचा फोन आला होता. त्यानंतर अ‍ॅडमिशन घेण्यासाठी ती निघून गेली. त्यानंतर आजपर्यंत ती घरी परत आलेली नाही. तसेच, तिघे आरोपी देखील त्यांच्या घरी आढळून आलेले नाही. त्यामुळे मुलीच्या आईने तिघांच्या विरोधात अज्ञात कारणास्तव मुलीचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद यापूर्वी तिच्या आईने १५ जून रोजी दिली आहे. त्यानंतर त्यांनी आज थेट मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे करीत आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अटक नसल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)