शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पुण्यातील शैक्षणिक संस्था चालकांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:10 IST

पुणे : पुण्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया, शुल्क आकारणीसंदर्भात अवास्तव मागणी करत काही सामाजिक व राजकीय संघटनांकडून शैक्षणिक संस्थांवर दबाव आणत ...

पुणे : पुण्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया, शुल्क आकारणीसंदर्भात अवास्तव मागणी करत काही सामाजिक व राजकीय संघटनांकडून शैक्षणिक संस्थांवर दबाव आणत त्रास दिला जात असल्याची तक्रार प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे. त्यांनी या संघटनांवर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि संबंधित शाळा-महाविद्यालयांना पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापकांनी सोमवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. काही सामाजिक व राजकीय संघटना शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये बेकायदा घुसून, जमाव जमवून मुख्याध्यापक व संस्थाचालकांवर दबाव आणून प्रवेश शुल्कासंदर्भात निदर्शने व आंदोलने करत आहेत. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. जैन, सचिव मिहीर प्रभुदेसाई, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे राजू सहस्त्रबुद्धे, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसाटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेर्लेकर, भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे, शाळांचे विधी सल्लागार अ‍ॅड. विक्रम देशमुख, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी), महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी (हुजूरपागा), सेवासदन, कन्नड संघ, प्रगती पथ फाऊंडेशन यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापक सहभागी होते.

काही दिवसांपूर्वीच शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपीएम शाळेमध्ये एका संघटनेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली हुल्लडबाजी केली. या प्रकारामुळे शाळांमधील शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे संस्थांचे म्हणणे आहे. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी व ४० ते ५० टक्के शुल्क कमी करण्याच्या अवास्तव मागण्या करीत आहेत. राज्य सरकारकडून शुल्कासंदर्भात येणाऱ्या आदेशाची आम्ही नक्कीच अंमलबजावणी करू. मात्र शाळा, संस्थांवर दबाव टाकून बेकायदेशीरपणे मागण्या मान्य करण्यासाठी होणारे प्रयत्न चुकीचे असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.