शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोपनीयता भंगप्रकरणी आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: October 25, 2016 06:27 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा सात आॅक्टोबरपूर्वीच फुटला. याची चौकशी करून गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा सात आॅक्टोबरपूर्वीच फुटला. याची चौकशी करून गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आणि प्रभागरचना सात आॅक्टोबरला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जाहीर करण्यात आली. या वेळी आयुक्त आणि निवडणूक अधिकारी उपस्थित होते. ही आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी महिनाभर अगोदरपासूनच प्रभागरचना फुटल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी केला होता. प्रभागरचनेचे काम गोपनीय आणि पारदर्शक पद्धतीने झाले आहे. प्रभागरचना फुटल्याच्या बातम्या कपोलकल्पित आहेत. प्रसारित झालेली माहिती आणि आमच्याकडील माहिती यात साम्य आढळल्यास ही चूक निदर्शनास आणून दिल्यास आम्ही चौकशी करू, असे आश्वासन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले होते.प्रभागरचनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनीही एकमेकांवर आरोप केले होते. आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी गोपनीयतेचा भग केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (प्रतिनिधी)