शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:18 IST

रिक्षा परवान्यासाठी (परमिट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी कॅशलेस लाच स्वीकारल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रिक्षा परवान्यासाठी (परमिट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी कॅशलेस लाच स्वीकारल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरटीओने मंगळवारी पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार दाखल केली.एक बहाद्दर चक्क पेटीएमवरून कॅशलेस लाच स्वीकारत असल्याचे ‘लोकमतने’ उघड केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आरटीओने पोलिसांबरोबरच या माहितीच्या नोंदणीची जबाबदारी असणाºया नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडे (एनआयसी) याची तक्रार केली आहे. मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी पैसे घेणाºया व्यक्तीवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे शहर (जिल्हा) वाहतूक सेवा संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची भेट घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.आरटीओकडून सध्या शंभर जणांना दररोज मुलाखतीसाठी बोलावले जाते. अर्जदारांच्या अर्जाची नोंदणी झाल्यानंतर संबंधित अर्जदाराला मुलाखतीच्या तारखेचा एसएमएस पाठविला जातो. हजारोने आलेले अर्ज आणि दररोज शंभरच जणांची मुलाखत होणार असल्याने आत्ताच्या दाखल अर्जानुसार (दहा हजार) देखील शंभर कार्यालयीन कामाचे दिवस लागतील. याच अडचणीचा फायदा घेऊन एक व्यक्ती संदीप सानप या नावाने रिक्षाचालकांना फोन करून, मुलाखतीची तारीख देण्यासाठी दोनशे रुपयांची मागणी करीत होता. ही लाच पेटीएमद्वारे स्वीकारत असल्याचे ‘लोकमत’ने उघड केले.परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची रांगराज्य सरकारने रिक्षा परवाने खुले केल्यानंतर, परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची रांग लागली आहे. शनिवारी (दि.५) रात्रीपर्यंत आरटीओकडे तब्बल १० हजार अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची प्रक्रिया ही आॅनलाईन आहे. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित अर्जदाराला आरटीओकडे मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यात अर्जाबरोबर जोडलेल्या वाहन परवाना, बॅज, नामनिर्देशन पत्र, पोलिसांचे चारित्र्य पडताळणी अहवाल, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला याच्या मूळ प्रतिंची तपासणी केली जाते. या पडताळणीत पास झाल्यास संबंधिताला परवाना क्रमांक दिला जातो.ंमुलाखतीसाठी आॅनलाईन पैसे मागणाºया व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या शिवाय रिक्षा परवान्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींच्या अर्जावर तत्काळ कार्यवाही व्हावी, अर्जदारांना मुलाखतीची तारीख सुलभतेने मिळावी आणि या प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडे केली आहे.- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी