शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार तडजोडीअंती निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीने खोटा जबाब दिल्याकारणावरून पतीने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली होती. तडजोडीअंती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीने खोटा जबाब दिल्याकारणावरून पतीने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली होती. तडजोडीअंती त्याने ती तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पती बँगलोरचा असल्याने जिल्हाबंदीमुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली. यावेळी अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी अर्जदाराचा जबाब व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे नोंदवावा, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायाधीश जे. व्ही. भेंडे यांनी ती मान्य करत हा दावा निकाली काढला.

राहुल आणि सोनिया (नावे बदलेली आहेत.) अशी त्यांची नावे आहेत. राहुल बंग‌ळुरूचा राहणारा, तर सोनिया पुण्याची. २००७ मध्ये विवाह झाल्यानंतर २०११ साली घटस्फोटाचा दावा दाखल केला. यावेळी न्यायालयात अन्य दावेही चालू होते. यादरम्यान, एका दाव्यामध्ये सोनियाने न्यायालयात खोटा जबाब दिला. या कारणावरून राहुल याने तिच्याविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार २०१५ साली दिली. अ‍ॅड. झंजाड यांच्यामार्फत दाखल केलेली तक्रार अनेक वर्षं न्यायालयात सुनावणी सुरू होऊन प्रलंबित राहिली. यादरम्यान, न्यायाधीशांनी दोघांनी आपसांत तडजोड करावी या उद्देशाने दोघांनाही त्याबाबत समज दिली. त्यानुसार दोघांनीही आपापसांत चर्चा करून दाव्यामध्ये तडजोड करण्याचे मान्य केले.