पुणे : लोणवळा येथील विद्या प्रसारणी सभेच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक सोई - सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयाची चौकशी करून कारवाई करावी, असे निवेदन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे. महाविद्यालयाकडे पात्रताधारक शिक्षक व कॉलेज सुरू झाल्यापासून पूर्णवेळ प्राचार्य नाहीत. तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा नाही. महाविद्यालय प्रशासनाकडून खासगी क्लासेस मधून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करावा,असे सांगितले जाते. त्यामुळे कॉलेजमधील प्रथम वर्षाच्या ३० विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थी नापास झाले. द्वितीय वर्षीचे १४६ पैकी १३२ विद्यार्थी नापास झाले आहेत. तर मॅकॅनिकल विषयाच्या तृतिय वर्षाच्या१०४ विद्यर्थ्यांपैकी ८० विद्यार्थी नापास झाले आहेत. महाविद्यालय प्रशासनाकडे सोई सुविधांबाबत वारंवार मागणी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे महाविद्यालयातील अपुऱ्या सोई-सुविधांबाबत निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)अपुऱ्या विद्यार्थी संख्येमुळे महाविद्यालयातील दोन शाखा बंद केल्या आहेत. महाविद्यालयामध्ये पात्रताधारक प्राध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर केले आहेत. गैरहजेरीमुळेच विद्यार्थ्यांच्या अनुत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. कॉलेजवर केले जाणारे आरोप चुकीचे आहेत. - बाबा शिंगरे
अभियांत्रिकी कॉलेज विरोधात तक्रार
By admin | Updated: July 3, 2016 03:53 IST