शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फोडल्याप्रकरणी १९ शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार

By admin | Updated: April 24, 2016 04:21 IST

उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा धोक्यात येत आली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून शेतकरी पाणी चोरत

भिगवण : उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा धोक्यात येत आली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून शेतकरी पाणी चोरत असल्याची तक्रार यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता एस. व्ही. नखाते यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती यांना पाणीपुरवठा करण्यासाठी कुंभारगाव ते बारामती अशी जलवाहिनी २५ वर्षांपूवी करण्यात आली आहे. बराच कालावधी उलटल्याने ही जलवाहिनी जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी या जलवाहिनीमधून पाणीगळती होत आहे. त्यातच उजनीतील पाणीसाठा कमी झाल्याने जलवाहिनीचे पाणी बारामती उद्योगाला कमी पडत आहे. त्यामुळे महामंडळ अधिकारी यांचे लक्ष गळतीकडे गेले आहे. भिगवण पोलिसांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेत शेतकऱ्यांना बोलावून समजावून सांगत गुन्हे दाखल करण्याची घाई केली नसल्याचे समजते. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंद्रशेखर यादव यांनी शेतकरी आणि महामंडळाचे अधिकारी यांच्यात सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिल्याचे समजते. तर गुन्हे दाखल झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचे यातील शेतकऱ्यांनी सांगितले.याबाबत नखाते यांनी मदनवाडी, बंडगरवाडी येथील सुमारे १९ शेतकऱ्यांच्या नावे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यामध्ये हे शेतकरी या जलवाहिनीतून पाणी चोरत असल्याचा आरोप केलेला आहे. यासाठी महामंडळाने काही दिवसांपूर्वी या जलवाहिनीच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त घेतला होता. त्यासाठी दोन लाखांची रक्कमही अदा केली आहे. त्यामुळे महामंडळ आणि शेतकरी यांचा वाद पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.