शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हप्ते वसूल करणाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार करा

By admin | Updated: January 11, 2016 01:30 IST

दादागिरी, गुंडगिरी करून उद्योजकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्याकडून जबरदस्ती हप्ते वसूल करणाऱ्या माथाडी कामगार संघटना आणि माथाडी टोळ्यांच्या विरोधात पोलिसांकडे नावासह तक्रार करावी

पिंपरी : दादागिरी, गुंडगिरी करून उद्योजकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्याकडून जबरदस्ती हप्ते वसूल करणाऱ्या माथाडी कामगार संघटना आणि माथाडी टोळ्यांच्या विरोधात पोलिसांकडे नावासह तक्रार करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनने उद्योजक व लघुउद्योजकांना केले आहे. माथाडी कामगार संघटनांची दादागिरी व गुंडगिरी आणि या ब्लॅकमेलिंगला वैतागलेले उद्योजक यावर प्रकाश टाकणाऱ्या बातम्या ‘लोकमत’ने ठळकपणे प्रसिद्ध केल्या आहेत. यामुळे लोकमतचे अनेकांनी अभिनंदन करीत आभार व्यक्त केले. सरकार, मंत्री, एमआयडीसी प्रशासन आणि पोलीस निष्क्रिय असल्याने माथाडीची गुंडगिरी आणि दादागिरी संपत नसल्याची खंत उद्योजक आणि लघुउद्योजकांनी व्यक्त केली. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष इरफान सय्यद यांनी लोकमतकडे निवेदन देऊन सदर मागणी केली आहे. उद्योगात अनेक कंपन्या माथाडी कायद्याचा वापर न करता अनधिकृत माथाडी संघटनांना रक्कम देऊन एकप्रकारे प्रोत्साहन देतात, असे त्यांनी म्हटले आहे. कायद्यानुसार काम करणाऱ्या अनेक संघटना मुंबई, पुणे व पिंपरी -चिंचवड परिसरातील अनेक छोट्या- मोठ्या कंपन्यांत कार्यरत आहेत. आतापर्यंत मान्यताप्राप्त माथाडी संघटनांच्या विरोधात गुंडगिरीसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक उद्योजक व लघुउद्योजकांना माथाडी कायद्याबद्दल पुरेशी माहिती नाही. त्यामुळे हे उद्योजक उद्योगाच्या सुरक्षेसाठी बोगस संघटनांना हप्ते देऊन मोकळे होतात. अशा संघटनांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्यांना वाव देण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुुसरीकडे काही उद्योग संघटनेचे नेते माथाडी संघटनेकडून होणारा जाच थांबविण्याची मागणी प्रशासन व वृत्तपत्राकडे करतात. अलीकडे बांधकाम व्यावसायिक, छोटे उद्योग या ठिकाणी अनेक माथाडीच्या फिरत्या टोळ्या दमदाटी करीत रक्कम वसुलीचे काम करीत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)