शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात टिकेल असे सक्षम विधेयक

By admin | Updated: December 22, 2015 01:33 IST

बैलगाडा बंदीविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल असे सक्षम विधेयक लवकरच पारित करून घेण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

पाईट : बैलगाडा बंदीविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल असे सक्षम विधेयक लवकरच पारित करून घेण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. लवकरात लवकर बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी मी व सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिष्टमंडळाला दिले.बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे जावडेकर यांची भेट घेतली. मागील सरकारने बैल या प्राण्याचा वन्य प्राण्यांत समावेश केला. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणणे शक्य झाले होते. बैलगाड्यांचे समर्थक म्हणणाऱ्यांनीही विरोध केला नाही. त्याच वेळेस विरोध केला असता तर बैलगाडा शर्यती बंद झाल्या नसत्या. मात्र हेच लोक आता बैलगाडा शर्यती चालू झाल्या नाही तर आंदोलनाची भाषा बोलत आहते. परंतु आपले सरकार बैलगाडा शर्यती लवकरचसुरू करेल, असे जावडेकर यांनी सांगितले. वस्तुस्थितीची माहिती मांडण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तान्हाजी दिवेकर, माजी सभापती शरद बुट्टे-पाटील, राजगुरुनगरचे माजी सरप्ांच व भाजपानेते अतुल देशमुख, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रामदास मेदनकर, बैलगाडामालक दत्तात्रय रौंधळ, मुकुंद बोराडे, दत्तात्रय सातकर आदी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)