शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकेचे बुकिंग रद्द करूनही पैसे न दिल्याने कंपनीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सदनिकेचे बुकिंग रद्द करूनही बुकिंगचे पैसे परत न करणाऱ्या एका कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सदनिकेचे बुकिंग रद्द करूनही बुकिंगचे पैसे परत न करणाऱ्या एका कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बुकिंगसाठी स्वीकारलेले १ लाख रुपये ९ ऑक्टोबर २०१९ पासून १० टक्के व्याजाने परत करावे. तसेच नुकसानभरपाईपोटी २५ हजार, तर तक्रारीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये देण्यात यावे, असा आदेश दिला आहे.

याबाबत अभिजित बोराटे, भाग्यश्री बोराटे यांनी साहिल प्रॉपरटीज, प्रोपरायटर विरुद्ध अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, शुभांगी दुनाखे यांनी हा आदेश दिला आहे.

तक्रारदारांना सदनिका खरेदी करण्याची असल्याने त्यांनी कंपनीला भेट देऊन ते विकसित करत असलेल्या प्रकल्पाविषयी माहिती घेतल्यानंतर तक्रारदारांनी एक सदनिका बुक केली. सदनिकेच्या बुकिंगच्यावेळी तक्रारदारांनी १ लाख रुपये भरले. त्यानंतर विरुद्ध पक्षाने तक्रारदारांना वेलकम लेटर दिले. बुकिंग केलेल्या दिनांकापासून अ‍ॅग्रीमेंट फॉर सेल करणे गरजेचे होते. मात्र, बराच कालावधी गेल्यावरदेखील विरुद्ध पक्षाने अ‍ॅग्रीमेंट फॉर सेल केले नाही.

वारंवार विनंती करून देखील तक्रारदारांना योग्य माहिती दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी २६ मार्च २०१९ रोजी बुकिंग रद्द करून भरलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. त्याबाबतचा ई-मेल देखील त्यांनी विरुद्धपक्षाला पाठवला. त्यानंतर २९ मार्च २०१९ रोजी विरुद्धपक्षाने बुकिंग केल्यावर १५ दिवसांच्या आत रद्द केल्यास कॅन्सलेशन पोटी ५१ हजार रुपयेची कपात करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यावर तक्रारदार यांनी कोणताही करार झालेला नसताना कपात करण्याचा प्रश्न येत नसल्याचे विरुद्धपक्षाला कळवले.

विनंती करूनही रक्कम न दिल्याने ग्राहक आयोगात धाव

दरम्यान, वारंवार विनंती करूनदेखील रक्कम परत मिळत नसल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली. बुकिंगसाठी भरलेले १ लाख रुपये १८ टक्के व्याजाने मिळावे, मानसिक त्रासापोटी, तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत केली. आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर बुकिंगपोटी भरलेले १ लाख रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश दिला.