चाकण : येथील एमआयडीसीतील ओम निमजाईमाता फोर्ज कंपनीत मशीनची डाय लागून झालेल्या अपघातात परप्रांतीय कामगार मरण पावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल शिवलाल यादव (वय ३२, रा. ओमनीमजाईमाता फोर्ज, महाळुंगे इंगळे, मूळ गाव झारखंड ) असे मृत कामगाराचे नाव आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास झाला होता. मशीनची डाय निसटून त्याच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला होता. खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता उपचारांदरम्यान तो मरण पावला. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
कंपनी अपघातातील जखमीचा मृत्यू
By admin | Updated: January 25, 2017 01:27 IST