शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

संवादकौशल्याची शिकवणी

By admin | Updated: February 10, 2017 03:03 IST

निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. गलोगल्ली प्रचाराचा भडिमार सुरू आहे.विविध माध्यमातून मतदारराजाला जागृत करण्यासाठी प्रचारयंत्रणा राबविली जात आहे.

चिंचवड : निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. गलोगल्ली प्रचाराचा भडिमार सुरू आहे.विविध माध्यमातून मतदारराजाला जागृत करण्यासाठी प्रचारयंत्रणा राबविली जात आहे. मात्र उमेदवाराने मतदारांशी कसे बोलावे कोणत्या पद्धतीने आपले विचार मांडावे व बोलताना भाषाशैली कशी असावी, यासाठी उमेदवारांच्या भाषण कला संवादकौशल्याच्या शिकवणी घेतल्या जात आहेत. या साठी अनेक उमेदवार वेळ काढून अशा प्रकारच्या अभ्यासाचे धडे घेत आहेत.निवडणुका फक्त प्रचारातून जिंकता येत नाहीत, यासाठी उमेदवाराचे राहणीमान व भाषा कैशल्य ही महत्वाचे असते. हा कानमंत्र अनेक राजकीय नेत्यांनी सध्याच्या उमेदवारांना दिला आहे. यासाठी शहरातील अनेक इच्छुक राजकीय क्षेत्रात अभ्यासाचे धडे घेण्यासाठी शिकवणीला जात आहेत. इयत्ता चौथीपासून तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले उमेदवार या अभ्यासात व्यस्त आहेत. या मुळे राजकीय अभ्यासाचे शिक्षण देणाऱ्या व्यक्तींची सध्या चांदी होत आहे.काही जण वर्षभरापासून तयारी करत आहेत. तर काही जण महिनाभर तर काही जण पंधरा दिवसांच्या शिकवणीला बसले आहेत. अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या काही उच्चशिक्षित व्यक्ती व प्राध्यापक सध्या या कामात व्यस्त आहेत. यासाठी उमेदवारांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. व्यासपीठावर कसे बोलावे यासाठी माईक हातात देऊन भाषाणाचे विषय दिले जात आहेत. कथाकथन यांचा संदर्भ कसा व केव्हा द्यावा याचे धडे दिले आहेत.आत्मविश्वास वाढविण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत याची माहिती दिली जात आहे. बोलताना चेहऱ्यावरील हावभाव कसे ठेवावे व गमती जमती करत समोर असणाऱ्या व्यक्तीला कसे आकर्षित करावे यासाठी विशेष लक्ष दिले जाते. महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांशी कसा संवाद साधावा, नम्रता दाखवून कोणाला कसा नमस्कार करावा हे सांगितले जात आहे. याचबरोबर आपले कपडे कसे असावेत याचेही शिक्षण दिले जात आहे. अनेक उमेदवार सध्या आपल्या व्यस्त वेळेतून काही वेळ या शिकवणीला देत आहेत. (वार्ताहर)