शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळे व प्रशासनात समन्वयासाठी समिती

By admin | Updated: April 6, 2016 01:35 IST

गणेशोत्सव आला की दरवर्षी गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद होतात आणि या दोघांमध्ये संघर्ष उभा राहतो. हा संघर्ष संपविण्यासाठी आणि दोघांमध्ये

पुणे : गणेशोत्सव आला की दरवर्षी गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद होतात आणि या दोघांमध्ये संघर्ष उभा राहतो. हा संघर्ष संपविण्यासाठी आणि दोघांमध्ये समन्वय साधत पुण्याचा गणेशोत्सव जगभरात आदर्श ठरविण्यासाठी समन्वय समिती स्थापण्यात येणार आहे. ज्यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे महापालिका, पोलीस, राज्यप्रशासन यांच्या प्रतिनिधींबरोबर गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक व्यक्तींचा यामध्ये समावेश असेल, अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली.गणेश मंडळे, प्रशासनाचे अधिकारी यांच्या बैठकीचे केसरीवाड्यात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डिगे बोलत होते. या वेळी सहायक पोलीस आयुक्त पी. बी. लोखंडे, उपजिल्हाधिकारी गायकवाड, धर्मादाय सहायक आयुक्त नवनाथ जगताप, नगरसेविका मुक्ता टिळक, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.डिगे म्हणाले, की गणेश मंडळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील बहुतांशी हे प्रशासनाशी निगडित आहेत. ते सोडविण्यासाठी समन्वयाची आवश्यकता असल्याने ही समन्वय समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजचे युग हे ब्रँडिंगचे युग आहे. पुण्यातील गणेशोत्सव जगभरात नावाजलेला आहे. त्याचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच गणेश मंडळांची संख्या कमी करणे आदी उद्देशांसाठीही ही समन्वय समिती स्थापण्यात येणार आहे. या वेळी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्या वेळी त्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. पराग ठाकूर यांनी कधीही अमलात न येणाऱ्या एक खिडकी योजनेबाबत नाराजी व्यक्त केली. प्रताप परदेशी यांनी सकारात्मक, समाजोपयोगी काम करणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्याची मागणी केली. भाऊसाहेब करपे यांनी स्पिकरच्या भिंती वाढण्यामागच्या कारणांचा ऊहापोह केला. संदीप मोकाटे यांनी कोथरूडमध्ये स्थापलेल्या नियोजन समितीमुळे प्रश्न कमी झाल्याची माहिती दिली. आनंद सराफ यांनी ध्वनिक्षेपकांच्या वापराऐवजी त्यांच्या उत्पादनावर बंदीची मागणी केली. पोलिसांची भूमिका विशद करताना लोखंडे म्हणाले, की गणेश मंडळांचा बहुतांशी रोष हा पोलिसांवर असतो. पण पोलीस कायदा राबविण्याचे काम करतात. कोणावरही ऊठसूट खटले दाखल करीत नाहीत. पोलिसांची भूमिका ही नेहमी सहकार्याची आहे आणि पुढेही राहील.टिळक म्हणाल्या, की मंडळांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यशासनाने महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाची स्थापना केली असून, त्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.शेटे म्हणाले, की गेल्या १० वर्षांपासून प्रशासन विरुद्ध गणेश मंडळे अशी स्थिती निर्माण होत आली आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्थापण्यात येणाऱ्या समन्वय समितीकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.