शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

समिती अध्यक्षांना काहीच काम नसते...!

By admin | Updated: May 26, 2017 06:19 IST

महापालिकेच्या सभागृहात नव्याने निवडून आलेल्या अनेक नगरसेविका व विषय समितीच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांना सर्वसामान्य नागरिकांसाठी काही तरी चांगले करण्याची धडपड आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या सभागृहात नव्याने निवडून आलेल्या अनेक नगरसेविका व विषय समितीच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांना सर्वसामान्य नागरिकांसाठी काही तरी चांगले करण्याची धडपड आहे. यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न देखील सुरू आहेत. परंतु प्रशासन या नवीन लोकप्रतिनिधींना कशाचा थांगपत्ता लागून द्यायला तयार नाही. महिला व बालकल्याण समितीच्या राणी भोसले यांनादेखील असाच अनुभव आला. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तर चक्क समिती अध्यक्षांना काहीच काम नसल्याचे सांगून टाकले.पंधरा वर्षांनंतर सत्ताबदल होऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. यामध्ये १६२ सदस्यांपैकी तब्बल शंभरपेक्षा अधिक सदस्य हे नव्याने निवडून आले आहेत. यात अनेक महिला सदस्यांनी तर पहिल्यांदा महापालिकेची पायरी चढली आहे. त्यामुळे येथील कारभार समजून घेणे आणि त्यानंतर आपल्या प्रभागातील लोकांची कामे करणे खूपच कठीण जात आहे. यामध्ये पन्नास टक्के आरक्षणामुळे महिला सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये अनेक महिला सदस्या उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी काही तरी चांगले करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे. परंतु कारभारात मुरलेले व मातब्बर अधिकारी पाहिजे तेवढे सहकार्य मात्र करण्यास तयार नाहीत.महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राणी भोसले यांनी समिती व अध्यक्षांना काय अधिकार असतात, कोणत्या विषयांमध्ये पुढाकार घेऊ शकतो, याबाबतची माहिती त्यांनी विभागाचे प्रमुख संजय रांजणे यांना विचारली. परंतु त्यांनी थेट तुम्ही काही काळजी करू नका, अध्यक्षांना काही काम नसते, असे बिनधोक सांगून टाकले. त्यानंतर देखील अनेक विषयांची माहिती मागितल्यास याच स्वरूपाची उत्तरे त्यांनी मिळू लागली. हे काम तुम्ही करू शकत नाही... हा अधिकार समितीला नाही... असे सतत ऐकावे लागले. अखेर भोसले यांनी समितीच्या अध्यक्षांना, समितीला काहीच काम नसल्याचे लेखी देण्याची मागणी केली. यामुळे काही प्रमाणात माहिती मिळण्यास सुरुवात झाली. याचप्रमाणे विधी समितीच्या बैठकांनादेखील अधिकारी दांडी मारत असल्याचे समोर आले. याबाबत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी लक्ष घातल्यानंतर व आयुक्तांना लेखी पत्र दिल्यानंतर अधिकाऱ्यांना महिलांचा दणका जाणवला.महापालिकेत नव्याने निवडून आलेल्या माझ्यासारख्या अनेक महिला सदस्यांमध्ये चांगले काम करण्यासाठी धडपड करतात. विषय माहिती करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जातात. परंतु ज्या प्रमाणात माहिती मिळणे अपेक्षित आहे, ती मिळत नाही. अधिकारी अनेक वेळा लोकप्रतिनिधींना गृहीत धरतात, हे चुकीचे आहे. सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रीत काम केले पाहिजे.- अ‍ॅड. गायत्री खडके, अध्यक्षा, विधी समितीसर्वसामान्य नागरिकांची कामे करण्यासाठीच लोकांनी आम्हाला निवडून दिले. परंतु महापालिकेत आल्यावर समजले की आपली कितीही धडपड असली तरी अधिकारी जो पर्यंत मनावर घेत नाही तो पर्यंत आपण काहीच करू शकत नाही. महापालिकेचा कारभार समजण्यासाठी नवीन सदस्यांना प्रशिक्षण दिले जाते. परंतु अधिकाऱ्यांनी माहितीच दिली नाही किंवा काही सांगितलेच नाही तर कितीही प्रशिक्षण झाले तरी महापालिकेत काम करणे आवघड आहे.- राणी भोसले, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती