शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचा आयटीयन्सशी संवाद

By admin | Updated: February 8, 2017 03:01 IST

आयटी अभियंता रसिला राजू ओपी या तरुणीच्या खून प्रकरणानंतर पुणे शहर पोलिसांच्या वतीने महिला सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे शहर पोलीस

पिंपरी : आयटी अभियंता रसिला राजू ओपी या तरुणीच्या खून प्रकरणानंतर पुणे शहर पोलिसांच्या वतीने महिला सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मंगळवारी हिंजवडीतील आयटी पार्क क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरुष अभियंत्यांबरोबर थेट संवाद साधला. त्यांना सुरक्षिततेसंबंधी भेडसवणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर योग्य त्या उपाययोजना करणार असल्याची ग्वाही दिली. इन्फोसिस कंपनीच्या पहिल्या गेटपासून ते हिंजवडी फेज २ मधील विप्रो गेट १ पर्यंत वॉक वीथ कमिशनर उपक्रमात आयटी कंपन्यांतील तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रखवालदाराच्या हल्ल्यात बळी गेलेल्या रसिला हिला आयटीयन्स तरुण, तरुणींनी आदरांजली वाहिली. त्यानंतर पोलीस आयुक्त शुक्ला यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा जनजागृती फेरी काढण्यात आली. आयुक्त शुक्ला यांनी चालता चालता अनेक तरुणींशी संवाद साधला. या जनजागृती फेरीत परिसरातील विविध आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे शेकडो आयटीयन्स सहभागी झाले होते. सहआयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, चतु:शृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर आदी उपस्थित होते. विप्रो प्रवेशद्वाराजवळ जनजागृती फेरीचा समारोप झाला. त्यानंतर इन्फोसिस कंपनीच्या आवारात प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यात आयटीक्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)