शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील तलावांची आयुक्तांकडून गंभीर दखल

By admin | Updated: June 14, 2017 04:05 IST

सोमवारच्या पावसाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा उघड केला. त्याची आयुक्त कुणाल कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी दिवसभर महापालिकेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सोमवारच्या पावसाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा उघड केला. त्याची आयुक्त कुणाल कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी दिवसभर महापालिकेचे सर्व विभागप्रमुख प्रभागनिहाय पाहणी करणार असून, काम झालेले नसेल, अपुरे असेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांवर लगचेच कारवाई करण्यात येईल. ही कारवाई करतानाच ते कामही पूर्ण करून घेतले जाईल.आयुक्तांनीच ही माहिती दिली. सोमवारच्या पावसाने शहरात कुठेकुठे पाणी साचले, त्याची माहिती घेतली. दिवसभर तक्रारीही येत होत्या. त्यावरून माहिती मागवली असता नालेसफाईचे काम १०० टक्के झाले असल्याची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी दाखवली. कागदोपत्री तरी काम पूर्ण झाले असल्याचे दिसते. तरीही पाणी साचत असेल तर त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे. त्यामुळेच सर्व विभागप्रमुख बुधवारी दिवसभर शहराची प्रभागनिहाय माहिती घेतील, असे आयुक्तांनी सांगितले.त्यासाठी सर्व विभागप्रमुखांचे नावासह वेळापत्रकच तयार करण्यात आले आहे. काही नागरिकांकडून पाणी साचलेल्या ठिकाणांची नावेही समजली आहे. एकूण किती ठिकाणी पाणी साचले, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही; मात्र बुधवारच्या पाहणीनंतर ती मिळेल. त्यानंतर त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना तिथे झालेल्या नालेसफाईच्या कामाबाबत विचारण्यात येईल. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनाचा अहवाल उद्या महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापना विभागाचा अहवाल पूर्ण झाला असून, येत्या १५ जून रोजी तो प्रकाशित करण्यात येईल. प्रभागनिहाय स्वतंत्र कक्षही सुरू करण्यात येणार असून, तिथे नागरिकांना वसाहतीत पाणी घुसले, नाले तुंबले वगैरेबाबत तक्रारी करता येतील. त्याची त्वरित दखलही घेतली जाईल, असे आयुक्त म्हणाले. महापालिका प्रशासनाचे शहरातील स्थितीवर लक्ष असून आपत्तिजनक ठिकाणी काळजी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.