शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त-पदाधिकारी पुन्हा आमने-सामने

By admin | Updated: February 11, 2016 03:14 IST

स्मार्ट सिटी प्रस्तावाचे महाभारत ताजे असतानाच २४ तास पाणीपुरवठा योजना, सौरऊर्जा प्रकल्प यांच्या मंजुरीवरून महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार व काँग्रेस, मनसे, शिवसेना,

पुणे : स्मार्ट सिटी प्रस्तावाचे महाभारत ताजे असतानाच २४ तास पाणीपुरवठा योजना, सौरऊर्जा प्रकल्प यांच्या मंजुरीवरून महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार व काँग्रेस, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर व्हावा, म्हणून आयुक्तांनी पुन्हा एकदा राजकीय पक्षांच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.मुख्य सभेची २४ तास पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी घेण्यासाठी येत्या गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेचा आराखडा मंजूर करण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्य सभेविरोधात शासनाकडे धाव घेतली होती. त्यानंतर २४ तास पाणीपुरवठा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आयुक्तांनी पुन्हा एकदा प्रयत्नांची शिकस्त चालविली आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी पाणीपट्टीमध्ये ५ वर्षांत ८७ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेस, मनसे, शिवसेनेने विरोध केला आहे. विषय मार्गी लागण्यासाठी आयुक्तांकडून प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मान्यता मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नाराजीचा सूर आहे. त्याचे पडसाद गुरुवारी मुख्य सभेत उमटण्याची शक्यता आहे.सौरऊर्जा प्रकल्पासाठी फेरप्रस्ताव मांडणारसौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करणारी देशातील पहिली महापालिका बनण्याचा मान पुणे महापालिकेला मिळणार, असे स्पष्ट करून कुणाल कुमार यांनी सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेना या पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. सौरऊर्जा प्रकल्प ठेकेदारांमार्फत न राबविता महापालिकेने स्वत: राबवावा, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली. स्थायीच्या या निर्णयामुळे कुणाल कुमार नाराज झाले असून, स्थायी समितीच्या सदस्यांनी याचा फेरविचार करावा, असा प्रस्ताव त्यांच्याकडून मांडण्यात येणार आहे.मंजुरी न दिलेल्या विषयांची माहिती द्यास्थायी समिती, मुख्य सभेतील मंजुरी न मिळालेल्या विषयांची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी नगरसचिव कार्यालयाकडून तातडीने मागविली आहे. या विषयांना अनेक दिवसांपासून मंजुरी न दिल्यामुळे त्याला स्वत:च्या अधिकारात मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी आयुक्तांकडून ही माहिती मागविण्यात आल्याचा आरोप राजकीय पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. याविरोधात आयुक्तांनी अशा प्रकारे स्वत: अधिकारात परस्पर घेतलेल्या निर्णयांची माहिती मागविण्याचा निर्णय राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.