शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीगडावर रूढीपरंपरांचे व्यापारीकरण

By admin | Updated: December 18, 2014 04:41 IST

महाराष्ट्रातील प्रमुख पाच तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर पुरातन काळापासून चालत आलेल्या धार्मिक रूढीपरंपरांचे मोठ्या

जेजुरी : महाराष्ट्रातील प्रमुख पाच तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर पुरातन काळापासून चालत आलेल्या धार्मिक रूढीपरंपरांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण होत आहे. देवसंस्थान विश्वस्तांच्या डोळ्यांदेखत भाविकांची होणारी लूट थांबविण्याची मागणी माजी प्रमुख विश्वस्त व माजी नगराध्यक्ष ज्ञानोबा दरेकर यांनी केली आहे. राज्यातील पंढरपूर, आळंदी, तुळजापूर, नाशिक आणि जेजुरी ही ब्रिटिशकाळापासून अत्यंत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे मानली जातात. शासकीय पातळीवरून या तीर्थक्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र, जेजुरी वगळता इतर ठिकाणी शिस्त आहे. तशी जेजुरीत नसल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली. जेजुरीत यात्राकाळात पोलीस प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन केले जाते, देवसंस्थान मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती असून, देव संस्थानने प्रामुख्याने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. मुख्य मंदिरातील सभामंडप आणि गडकोटातील बालद्वारी मंडपाला पावसाळ्यात गळती होते. मुख्य मंदिरातील सभामंडपाच्या छताच्या दगडी तुळर्इंना चिरा पडलेल्या आहेत. त्यांची डागडुजी होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास विश्वस्त मंडळ व त्यांचे प्रशासनच जबाबदार राहणार असल्याने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वास्तुशास्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराचे व गडकोटाचे जतन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळाची आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाहणी करण्याबाबत निवेदन देणार असल्याचे दरेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)