उपकेंद्रात आयोजित लसीकरणाप्रसंगी सरपंच चंद्रभागा खर्डे , मंत्रालय कक्षाधिकारी अजय खर्डे, ग्रामविकास अधिकारी के. बी. घासले, ग्रामपंचायत सदस्य विजय घोलप, सोपान पुंडे,दिपक पुंडे,शर्मिला तळोले, राजश्री रूपनेर,आशिया तांबोळी, विठ्ठल खर्डे,दादा खर्डे, भरत गायकवाड, बाळू लोखंडे. प्राचार्य अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
कवठे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी नामदेव पानगे यांनी ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५९ वर्षांतील लोकांना लसीकरण करणार असल्याचे सांगितले. उपकेंद्रात पहिल्याच दिवशी गावातील १०० लोकांना लस देण्यात आली. यानंतर चार ते आठ आठवड्यांनी दुसरा डोस दिला जाणार आहे.
प्रास्ताविक कान्हूरमेसाई उपकेंद्राच्या प्राथमिक आरोग्य सेविका प्रियंका लंघे यांनी मांडले. आभार समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियंका घुले यांनी मानले. लसीकरणासाठी भाऊसाहेब पठारे, रसिक भोजने, आशा स्वयंसेविका आरती चव्हाण ,सुजाता जाधव ,सुरेखा पुंडे, प्रमिला पिंगळे, स्वप्नाली गोरडे, संगीता उबाळे छाया मोहिते आदींनी सहकार्य केले.
कान्हूरमेसाई.
आरोग्य उपकेंद्रात लस देताना आरोग्यसेविका प्रियंका लंघे समवेत कार्यकर्ते.