दरम्यान, आज पहाटे नियमित काकडा आरती आणि महापूजा झाल्यानंतर सकाळी कोडीत ग्रामस्थांच्या वतीने हभप संभाजी महाराज बडदे यांच्या हस्ते महाभिषेक करून महापूजा करण्यात आली. संत सोपानदेव देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक हिरूकाका गोसावी, त्रिगुण गोसावी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर ९. ३० ते ११. ३० या वेळात हभप संभाजी महाराज बडदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. दुपारी हभप विजय भिसे यांचे प्रवचन झाले. तर, रात्री एकनाथ महाराज पवार यांचे होऊन त्यानंतर सासवड येथील हनुमान भजनी मंडळाचे वतीने संगीत भजनाच्या जागराचा कार्यक्रम पार पडला.
शनिवार दि. ९ रोजी पहाटे संत सोपानदेव समाधीस पवमान अभिषेक घालण्यात येईल. सकाळी सोपान वाईकर आणि गेनबा पवार यांचे कीर्तन होईल. दुपारी ४ वा. नगरप्रदक्षिणा. रात्री लक्ष्मण बुवा एदला बादकर यांचे कीर्तन होईल. रात्री जागर होईल. रविवार, दि. १० रोजी सकाळी दिवे पंचक्रोशीतील कातोबानाथ दिंडीचे वतीने कीर्तन होईल. दुपारी सुनील फडतरे यांचे कीर्तन होईल. त्यानंतर चक्री प्रवचन होईल.रात्री बाळासाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन होईल.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
फोटो ओळ ; सासवड ( ता. पुरंदर ) येथील संत सोपानदेव मंदिरात हभप संभाजी महाराज बडदे यांच्या हस्ते समाधीस अभिषेक करून समाधी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.
तर दुसऱ्या छायाचित्रात संत सोपानदेव मंदिरात हभप संभाजी महाराज बडदे यांचे कीर्तन सुरू असताना.