या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर, वासुली गावच्या सरपंच मीरा दहातोंडे, उपसरपंच विक्रम पाचपुते, वराळेचे सरपंच दिनेश लांडगे, सुनील देवकर,दत्ता करंडे,भानुदास बुट्टे पाटील,आबा सांडभोर,संदिप बोत्रे,किसन पिंजण,तुकाराम करंडे,सुनील घनवट,शिवाजी कावरे,दत्तात्रय घनवट,आण्णा घनवट,तुकाराम तरस,सागर आंद्रे,पोलीस पाटील अमोल पाचपुते,रत्ना पिंगळे - देशमुख,भाऊसाहेब गायकवाड,ग्रामसेवक श्रीधर नाईकडे,वसंत तनपुरे,मालक पाचपुते,ऋत्विकराज मांडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भामचंद्र डोंगर संत तुकाराम महाराजांची तपोभूमी असल्याने तसेच डोंगरावर पांडवकालीन लेणी आहेत.येथे नेहमीच राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक व भाविक व साधकांसाठी येत असतात. येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांना स्वच्छतागृह व आंघोळीसाठी स्नानगृहाचे काम जवळपास आठ लाख रुपयांचा निधी खर्च करून करण्यात येत आहे. वासुली ग्रामपंचायतच्या माध्यमातून येथील भाविकांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
.
- भामचंद्र डोंगरपायथ्याशी कामाचे भूमिपूजन करताना मान्यवर.