शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

विनोदी किश्शांनी रसिक ‘पुलकित’

By admin | Updated: November 11, 2016 01:55 IST

पुलंच्या विनोदाचे किस्से सांगून हास्यरसात चिंब भिजविणारी ‘मिरासदारी’ शैली आणि एकदा आमच्या पुरंदरवाड्यामध्ये आल्यानंतर तो जिना पाहून ‘हा जिना म्हणजे एका जख्ख म्हातारीने कथकची पोज घ्यावी,

पुणे : पुलंच्या विनोदाचे किस्से सांगून हास्यरसात चिंब भिजविणारी ‘मिरासदारी’ शैली आणि एकदा आमच्या पुरंदरवाड्यामध्ये आल्यानंतर तो जिना पाहून ‘हा जिना म्हणजे एका जख्ख म्हातारीने कथकची पोज घ्यावी,’ असा पुलंनी केलेला विनोद कथन करणारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भारदस्त वाणीतील ‘खुमासदार’ शैली अशा दोन दिग्गजांच्या आठवणीतील साक्षीदार ठरलेल्या ‘पुलं’च्या एकसे बढकर विनोदी षटकारांमधून रसिकांची सायंकाळ ‘पुलकित’ झाली. पुलंची गाणी, वाणी आणि लेखणी आजही कशी ताजी आहे, याचा प्रत्यय आलेल्या या दिग्ग्जांनी पुलंच्या स्मृतीचा पट उलगडला.निमित्त होते, आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वन इव्हेंट्स अ‍ॅण्ड मीडिया आयोजित पुलोत्सवाचे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सागर पवार यांनी रेखाटलेल्या पुलंच्या व्यंगचित्राचे प्रकाशन करून पुलोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी द. मा. मिरासदार यांना जीवनगौरव सन्मान आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला तरुणाई सन्मान पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, अतुल शहा, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते.निवेदक सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून बहुगुणी पुलं रसिकांसमोर उलगडत गेले. एकदा एका ऐतिहासिक भिंतीवर कोणीतरी नाव कोरून ठेवले होते. त्याचा पुलंना विलक्षण राग आला आणि ते नाव खोडून टाकण्यासाठी ‘रात्री ये आणि त्याच्याखाली हे गृहस्थ कालच वारले,’ असे लिही. मिरासदारांनीही रसिकांवर हास्याचे फवारे उडवले. विनोदी, मिश्किल अशा पुलंना सामाजिक भानही प्रचंड होता, हे सांगताना द. मा मिरासदार यांनी त्याकाळी गरजूंना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी काम करणाऱ्या परूळेकर बाईंसाठी पुलंनी ४० हजार रुपयांचा निधी ४० प्रयोग करून कसा उपलब्ध करून दिला, हे ऐकविले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.