शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणविरहित विकासासाठी एकत्र या

By admin | Updated: May 8, 2017 02:04 IST

विकासाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे खानवडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचावे, यासाठी या गावचा आदर्श सांसद ग्राम योजनेत

लोकमत न्यूज नेटवर्कखळद : विकासाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे खानवडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचावे, यासाठी या गावचा आदर्श सांसद ग्राम योजनेत सहभाग करून सर्वांगीण विकास करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांना राजकारणविरहित विकासासाठी एकत्र या, असे आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले.आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत त्यांनी खानवडी गावाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून लोकसहभागासाठी तयारी आहे का, याची विचारणा केली. या वेळी सर्वांनी एकमुखाने होकार दर्शविल्यावर या गावचा आदर्श सांसद ग्रामचा तपशील पुरंदरचे तहसीलदार जिल्हाधिकारी यांना पाठवतील. त्यानंतर तो पंतप्रधान कार्यालयाकडे जाईल. तेथे यावर गावच्या निवडीविषयी चर्चा होऊन मगच निवडीची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या वतीने साबळे यांना गाव दत्तक घेण्याविषयी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, सरपंच दीपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, सुनील धिवार, सचिन लंबाते, गिरीश जगताप, साकेत जगताप, शेखर वढणे, आनंद जगताप, संदीप जगताप, गोकुळ गायकवाड, पी. एस. मेमाणे, चंद्रकांत टिळेकर, श्रीकांत ताम्हाणे तसेच ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.खानवडीत म. फुले यांच्या नावाने बहुउद्देशीय सभागृह उभारावे. तसेच गावचा सर्वांगीण विकास होईल, असा प्रयत्न व्हावा, असे दत्ता झुरंगे यांनी सांगितले. गावात आदर्श ग्रामयोजना खऱ्या अर्थाने राबवायची असेल तर गावातील प्रत्येक व्यक्तीने ही योजना यशस्वी होण्यासाठी काम केले पाहिजे, असे पिंपरी-चिंचवडचे माजी आयुक्त के. सी. कारकर यांनी सांगितले. खानवडी येथे फुले यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, असे सुनील धिवार, चंद्रकांत फुले यांनी सांगितले.