शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान येणार आमने-सामने

By admin | Updated: October 30, 2016 02:52 IST

फुलेनगर-नागपूर चाळ या प्रामुख्याने वस्तीभाग समाविष्ट असलेल्या प्रभागामध्ये रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ धेंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील गोगले

येरवडा : फुलेनगर-नागपूर चाळ या प्रामुख्याने वस्तीभाग समाविष्ट असलेल्या प्रभागामध्ये रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ धेंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील गोगले हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. प्रभागातील जनसंपर्क व आतापर्यंत केलेली विकासकामे आदी मुद्द्यांच्या आधारे या प्रभागामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीतील पालखी सोहळ्याचा पुणे शहरातील पहिला विसावा असलेले आदर्श इंदिरानगर तसेच शांतीनगर, नागपूरचाळ, राजीव गांधीनगर, भारतनगर, पंचशीलनगर, चंद्रभागानगर, मोझेनगर, कामगारनगर, श्रमिक वसाहत, एकतानगर आदी वस्तीभाग या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. वस्तीभागातील मतदारांच्या हातामध्ये इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. प्रभाग क्रमांक २ची एकूण मतदारसंख्या ८४ हजार ६७१ इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १९ हजार ८३३ इतकी तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १४६१ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या प्रभागात मोठ्या प्रमाणात असल्याने याठिकाणी अनुसूचित जातीसाठी दोन जागा आरक्षित ठेवणे आवश्यक असल्याची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकच जागा आरक्षित झाली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना आमने-सामने लढावे लागेल असे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसच्या शीतल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील गोगले, आरपीआयचे डॉ. सिद्धार्थ धेंडे व सुनंदा देवकर हे या प्रभागातील विद्यमान नगरसेवक आहेत. काही आजी-माजी नगरसेवक पक्षांतर करून पॅनल तयार करणार असल्याची चर्चा सध्या प्रभागात सुरू आहे. या प्रभागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय असल्याने मुस्लिम समाजाच्या इच्छुकांनाही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वसाधारण प्रवर्गातून नानासाहेब नलावडे, राजकुमार ढाकणे, भगवान जाधव, राहुल जाधव, असिफ तांबोळी, अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून हर्षद जाधव, सुधीर सरोदे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सुवर्णा संजय कदम इच्छुक आहेत. शिवसेनेकडून सर्वसाधारण प्रवर्गातून माजी नगरसेवक सागर माळकर, सुनील टिंंगरे, यशवंत शिर्के, अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून विलास कांबळे तर महिला प्रवर्गातून अर्चना कुचेकर यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून अजय सावंत, जालिंंदर कांबळे, भाजपाकडून सर्वसाधारण प्रवर्गातून चंद्रकांत जंजीरे, सुभाष चव्हाण, संदीप गुंजाळ, अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून नीलेश जठार उमेदवारीच्या तयारीत आहेत. लष्कर-ए-भीमाचे सचिन धिवार हेदेखील इच्छुक आहेत. मनसेकडून अमित जाधव, विजय सूर्यवंशी, महेश शिर्के, भाऊसाहेब प्रक्षाळे, राहुल प्रताप निवडणुकीची तयारी करत आहेत. एकूणच या प्रभागात चारही जागांवर चुरस असणार आहे. (प्रतिनिधी)प्रमुख परिसर- टिंंगरेनगर, आदर्श कॉलनी, नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंंग बोर्ड, शांतीनगर, मोहनवाडी, प्रतीकनगर, इंदिरानगर, फुले नगर, येरवडा कारागृह, येरवडा मेंटल हॉस्पिटल, राम सोसायटी, पंचशीलनगर, माजी सैनिक वसाहत, विश्रांतवाडी पोलीस लाईन, राजीव गांधी वसाहत, कॉमर झोन, येरवडा प्रिझन प्रेस, पुणे गोल्फ क्लब इ.