शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

संगीतमय आठवणींची रंगली मैफल

By admin | Updated: January 4, 2015 00:48 IST

अवीट मराठी गीतांना संगीताचा साज चढवून अजरामर केलेल्या तीन दिग्गज संगीतकारांच्या संगीतमय आठवणींची मैफल अनुभवण्याची संधी शनिवारी पुणेकरांना मिळाली.

पुणे : अवीट मराठी गीतांना संगीताचा साज चढवून अजरामर केलेल्या तीन दिग्गज संगीतकारांच्या संगीतमय आठवणींची मैफल अनुभवण्याची संधी शनिवारी पुणेकरांना मिळाली. त्यांनी संगीतबध्द केलेली गीते आणि त्यांच्या संगीत संयोजनाच्या आठवणी ऐकताना रसिकही भारावून गेले होते. हे तीन दिग्गज होते प्रभाकर जोग, अशोक पत्की व श्रीधर फडके. निमित्त होते प्रसिध्द संगीत संयोजक श्यामराव कांबळे यांच्या सांगितीक जीवनावरील ‘रहे ना रहे हम’ या पुस्तक प्रकाशन सोहळ््याचे. कांबळे यांची कन्या आशा वैद्य यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे अनुबंध प्रकाशनतर्फे प्रकाशन करण्यात आले. गीतकाराने गीत लिहिल्यानंतर संगीतकार त्याला चाल देतो. त्यापुढे संगीत संयोजक विविध विविध वाद्यांचा वापर नेमक्या ठिकाणी खुबीने करीत गाण्याची उंची वाढवितो. कांबळे यांनी आपल्या वेगळ््या धाटणीच्या संगीत संयोजनाने केलेल्या अजरामर गीतांच्या आठवणी सांगत तीनही संगीतकारांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी आशा वैद्य, अ‍ॅड. पी. बी. वैद्य, अनुबंधचे अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते. ‘हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली’ या गाण्याच्या संगीत संयोजनामागची भुमिका जोग यांनी सांगितली. ते म्हणाले, श्यामराव कांबळे यांनी विविध वाद्यांचा केलेला वापर अतिशय चपखल आहे. संयोजनासाठी ते प्रत्येक गोष्टीचा सांगोपांक विचार करीत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खुप आनंद घेतला. अनेक गाणी त्यांच्यासोबत केली. अशोक पत्की यांनी ‘नाविका रे वारा वाही रे’ या गीताच्या आठवणी सांगितल्या. गाणे व संयोजन एकवटून आणण्याची वेगळी कला कांबळे यांच्या अंगी होती. उपलब्ध वाद्यांमध्ये संयोजन केलेले हे गाणे त्यांच्या कलेची साक्ष देते, असे पत्की म्हणाले. आदर्श संगीत संयोजक म्हणून कांबळे यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. मुखडा व अंतरा यांना जोडणारा सेतु मधले संगीत असते. हा सेतु बांधण्याचे काम त्यांनी केले, असे फडके यांनी नमुद केले. तसेच ‘सांज ये गोकुळी’ या गीताच्या संगीत संयोजनाची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. कार्यक्रमात कांबळे यांनी संगीत संयोजन केलेली काही गीते ऐकविण्यात आली. आशा वैद्य यांनी पुस्तकामागची भुमिका स्पष्ट केली.