शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्विफ्टलेट’ पक्ष्यांच्या वसाहतीचे कुतूहल

By admin | Updated: November 19, 2014 04:28 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या प्रांगणातील छताला खंडांतर्गत स्थलांतरीत स्विफ्टलेट (अ‍ॅमेबिल) पक्ष्यांनी वसाहत तयार केली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या प्रांगणातील छताला खंडांतर्गत स्थलांतरीत स्विफ्टलेट (अ‍ॅमेबिल) पक्ष्यांनी वसाहत तयार केली आहे. त्यामध्ये ५० हून जास्त पक्ष्यांनी घरटी साकारली आहेत. या पक्ष्यांच्या किलबिलाटाने येथून येणाऱ्या - जाणारांना कुतूहलाचे वातावरण निर्मान झाले आहे. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील तावदाणात प्रवेश करताच घिरट्या मारून किलबिलाट करणाऱ्या लहान आकारातील पक्ष्यांकडे सर्वांचे लक्ष आपसूकच वेधले जात आहे. लांब शेपटी, काळसर डोके, पाठीचा पंखाचा भाग गडद निळा व वेगळी चमक असणारा, तसेच गळ्यापासून पोटाचा सर्व भाग पांढरा अशा वैशिष्ट्यांचा हा पक्षी आहे. या पक्ष्यांनी छताच्या कोपऱ्यांमध्ये चिखल मातीपासून ही अधांतरी दिसणारी घरटी तयार केली आहेत. महिन्यापासून ही घरटी तयार करण्यासाठी या पक्ष्यांची लगबग सुरू होती. आता ही घरटी तयार होऊन वसाहतच तयार झाली आहे. त्यामध्ये पक्ष्यांची ये - जा सतत सुरू असल्याने महापालिकेत कामानिमित्त येणारे अनेकजण कुतूहलाने या पक्ष्यांच्या हालचालींचे निरीक्षण करताना रमून गेल्याचे दिसून येते. एव्हाणा लोकवस्तीत या पक्ष्यांची घरटी आढळत नाहीत. मात्र अनेक जणांनी अशाप्रकारची पक्ष्यांची घरटी प्रथमच पाहिल्याने त्यांना याचे अप्रूप वाटल्याखेरीज राहत नाही. आफ्रिका खंडात विशेषत्वाने आढळणाऱ्या या पक्ष्यांची महाराष्ट्रात ‘वायर टेल्ड स्वॅलो’ (मराठी नाव : तार वाली पाकोळी) आणि ‘कॉमन इंडियन स्वॅलो’ या प्रजाती आढळतात. याच प्रजातीने येथे वसाहत तयार केली आहे. हा पक्षी बहुदा शेकडो, हजारोच्या थव्यांमध्ये वावरताना आढळून येत आहे. पूर्वी कठीण डोंगरकडा, कपारी, तसेच पडून राहिलेल्या दगडखाणींच्या सरळ भिंतींच्या खोबणीत घरटी करून हे पक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करताना आढळायचे. मात्र आता शहरी भागातही त्यांची वस्तीस्थाने दिसू लागली आहेत. याबाबत पक्षी अभ्यासक महेश महाजण म्हणाले,‘‘ हा पक्षी थंड हवामान असलेल्या भागात अंशकालीन स्थलांतर करीत असतो. गवताळ मैदाने तसेच पाणवठ्यांवरील हवेत उडणारे किटक हे त्याचे मुख्य खाद्य असून पंखांच्या खास रचनेमुळे घिरट्या घेत किटक पकण्यात ते तरबेज आहेत. बहुदा निशाचर असणाऱ्या या पक्षाचे १० वर्षाचे आयुष्य आहे. हा पक्षी १ ते २ अंडी देतो.’’(प्रतिनिधी)