शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कर्नल यांच्या पार्थिवावर अंत्यविधी, बेवारस असल्याने मृतदेह तीन दिवस ससून रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:23 IST

भारतीय सैन्य दलात कर्नल म्हणून काम केलेल्या आणि उतारवयात कुटुंबीयांची साथ न मिळालेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६४) यांना आयुष्याची संध्याकाळ कॅम्प परिसरातील एका पदपथावर घालवावी लागली.

येरवडा : भारतीय सैन्य दलात कर्नल म्हणून काम केलेल्या आणि उतारवयात कुटुंबीयांची साथ न मिळालेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६४) यांना आयुष्याची संध्याकाळ कॅम्प परिसरातील एका पदपथावर घालवावी लागली. त्यांचा तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी खून केला होता. ते बेवारस असल्याने त्यांना मृतदेह तीन दिवस ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलीसांनी वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत बाली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.बाली यांची तीन दिवसांपूर्वी अज्ञात मारेकºयांनी डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली होती. त्यांना कोणीही वारसदार नव्हते. त्यांचा मृत्यू झाल्यावर अंत्यविधी करण्यास कोणीही पुढे आले नाही. अखेर परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पुढाकाराने वंदे मातरम् संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत येरवडा स्मशानभूमीत सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या सैन्य अधिकाºयाच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. या वेळी १९७० मध्ये बाली यांच्यासोबत पुण्यातील एन. डी. ए.मध्ये शिक्षण घेणारे त्यांचे तत्कालीन मित्र आणि आताचे सैन्य दलातील सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. बाली यांची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी त्यांच्या तोंडून उपस्थितांना ऐकायला मिळाली. वंदे मातरम् संघटनेचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रशांत नरवडे, विनोद मोहिते, किरण कांबळे, अमन अलकुटे, अमोल जगताप, आकाश गजमल, सूरज जाधव, किरण राऊत यांनी ससूनमधून बाली यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता.त्यानंतर स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव नेण्यात आले. त्या वेळी जुलै १९७० ते जून १९७३ यादरम्यान बाली यांच्यासोबत ४४ व्या एन. डी. ए. बॅचमध्ये प्रशिक्षणार्थी असलेले आणि आता सैन्य दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने, लेफ्टनंट जनरल अभिजित गुहा, ब्रिगेडियर बी. एल. पुनिया, कर्नल सुभाष पाटील, कर्नल अजॉय पोद्दार, कर्नल एस. पी. एस. चिक्कारा प्रामुख्याने अंत्यसंस्कारास उपस्थित होते.>बडतर्फीनंतर फुटपाथवर आयुष्यरवींद्रकुमार बाली ४४ व्या एन. डी. ए.च्या बॅचमध्ये १९७० ते १९७३ दरम्यान शिक्षणासाठी पुण्यात होते. त्यानंतर सैन्य दलात सुमारे २० वर्षे कर्नल म्हणून कामगिरी केली होती. सैन्य दलात बाली कार्यरत असताना त्यांच्या सावत्र भावंडांकडून त्यांच्या सख्ख्या आईचा छळ केला जात होता. त्यामुळे ते वारंवार घरी यायचे. त्यामुळे सैैन्य दलाची शिस्त मोडल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून बेवारस म्हणून पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंटमधील आॅफिसर मेसच्या समोरील फुटपाथवर त्यांनी अखेरचा काळ घालविला.>रवींद्रकुमार बाली यांचा जन्म कोटा (राजस्थान) येथे झाला होता. त्यांचे वडील पोलीस खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दुसºया बायकोपासून रवींद्रकुमार यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर ते एनडीएमध्ये दाखल झाले.>प्रशिक्षणानंतर फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला बॉर्डर म्युजियम येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली होती. त्यांनी कौटुंबिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अविवाहित राहणेच पसंत केले.>सैन्य दलातील नोकरी गेल्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी केरळ सोडले. त्या पावसाळी दिवसात त्या रात्री त्यांनी एकट्याने घालविल्या. त्यांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे पावसात भिजून खराब झाली होती. त्या वेळी शेवटच्या टप्प्यात त्यांनी सायकलवरून प्रवास केला. केरळ सोडल्यानंतर पुणे शहरातील कॅन्टोन्मेंट परिसरातील फुटपाथ हेच जणू त्यांचे घर बनले होते.