शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा अंमल पुन्हा वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले बुरेवी चक्रीवादळ आत श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडकून तामिळनाडुच्या दिशेने सरकत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले बुरेवी चक्रीवादळ आत श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडकून तामिळनाडुच्या दिशेने सरकत आहे. सध्या या चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. गुरुवारी मध्यरात्री किंवा शुक्रवारी पहाटे ते तामिळनाडुतील पामबन आणि कन्याकुमारी दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.

चक्त्र ते मन्नारच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. सध्या तामिळनाडु, केरळमध्ये जाेरदार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ५ डिसेंबरपर्यंत जाणवणार आहे. त्यानंतर वाऱ्यांचा दिशा बदलल्यावर उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढून राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस राज्यात सकाळी धुके, दुपारी उकाडा आणि रात्री गारवा असे तीन वेगवेगळे वातावरण जाणवत होते. आता हळू हळू थंडीचा अंमल वाढू लागला आहे. राज्यात गुरुवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ११.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला. त्याचा परिणाम राज्यातील ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. बुरेवी चक्रीवादळाचा परिणाम आणखी ४ दिवस जाणवेल. त्यानंतर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर कमी झाल्यावर उत्तरेकडील थंड वारे राज्यात वाहण्यास सुरुवात होईल. त्यानंतर आपल्याकडे किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होऊ शकेल.

मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर कोकण, गोवा व विदर्भातील काही ठिकाणच्या किमान तापमानात किंचित घट झाली आहे.