शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीओईपीला अभिमतची प्रतीक्षाच

By admin | Updated: March 25, 2017 03:59 IST

काही वर्षांपासून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे

पुणे : काही वर्षांपासून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे (सीओईपी) विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) दुर्लक्ष केले जात आहे. शैक्षणिक दर्जा आणि क्षमता असून अभिमतचा दर्जा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.सीओईपीला यापूर्वीच स्वायत्तता मिळाली आहे. त्यानंतर महाविद्यालायाने सहा-सात वर्षांपूर्वी अभिमत दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. केंद्र सरकारसह यूजीसीकडेही सातत्याने हा पाठपुरावा करण्यात आला. अभिमतसाठी राज्य शासनाच्या समितीनेही याबाबतचा अहवाल दिला आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतर महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, संशोधन व इतर उपक्रमांमधील यशाचा आलेख वाढता आहे. तरीही यूजीसीकडून अद्याप समितीचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. या समितीची नेमणूक झाल्यानंतर महाविद्यालयाची पाहणी होऊन अभिमतचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत यूजीसी उदासीन असल्याचे दिसून येते. याविषयी संचालक डॉ. बी. बी. आहुजा म्हणाले, ‘‘यूजीसीने अद्याप समिती स्थापन केलेली नाही; त्यामुळे अभिमतचा प्रश्न रखडलेला आहे. हा दर्जा मिळाल्यास महाविद्यालयाला विविध क्षेत्रांत शैक्षणिकदृष्ट्या विविध प्रकारची संधी निर्माण होणार आहे. विद्यार्थिहिताचे विविध निर्णय घेता येतील.’’