शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाला आचारसंहितेचा फटका

By admin | Updated: November 8, 2016 01:33 IST

महाराष्ट्रात तेही पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात प्रथमच विश्व पंजाबी साहित्य संमेलन होत आहे, या संमेलनाच्या उत्तम नियोजनासाठी केंद्र

पुणे : महाराष्ट्रात तेही पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात प्रथमच विश्व पंजाबी साहित्य संमेलन होत आहे, या संमेलनाच्या उत्तम नियोजनासाठी केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेने पुढाकार घेऊन संंमेलनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याबरोबरच पहिल्या टप्प्यात आर्थिक निधीमध्येही सहभाग नोंदविला होता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. संमेलनाच्या व्यवस्थापनाला या आचारसंहितेचा फटका बसला असून, संमेलनाची आर्थिक गणितेही काहीशी विस्कटली आहेत. संमेलनाचे अडीच कोटीचे बजेट १ कोटी २० लाखांवर आले आहे. संमेलनाच्या खर्चाबाबत हात आखडता घ्यावा लागूनही तब्बल ४० ते ५० लाख रूपयांची तूट भासत असल्याचे सरहदद्दचे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले. गुरू गोबिंदसिंग यांच्या ३५० व्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यात सांस्कृतिक बंध दृढ व्हावेत या उददेशाने दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचा सोहळा रंगणार आहे. संत नामदेवांच्या कर्मभूमीत झालेल्या ‘घुमान’ च्या धर्तीवरच पुण्यातील विश्व पंजाबी साहित्य संमेलन व्हावे आणि इतिहासात त्याची नोंद व्हावी यादृष्टीने संमेलनाच्या आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. या संमेलनाच्या यशस्विततेसाठी केंद्र सरकारने संपूर्ण जबाबदारी घेण्याबरोबरच राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात आर्थिक सहभाग दर्शविला होता . महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २५ लाख रूपयांच्या निधीचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. सुरूवातीला संमेलनासाठी अडीच कोटीचे बजेट ठरविण्यात आले होते. पण, आचारसंहितेमुळे ते १ कोटी २० लाखांवर आले आहे. केंद्राकडून संपूर्ण २ कोटीची मदत मिळणार होती. संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत पुणे महानगरपालिका, पंजाब आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे असे छापण्यात आले होते. आचारसंहितेमुळे ते काढण्याची वेळ आली. ऐन संमेलनकाळातच आचारसंहिता लागू झाल्यामुळे बजेट पूर्ण कोसळले आहे. संमेलनाच्या खचार्साठी पंजाबी समाजाने पुढाकार घेतला आहे, आयोजकांनी पैसे काढले आहेत. कॉफी टेबल बुकमधून ५० लाख उभे राहणार आहेत. तरीही अजून ४० ते ५० लाख कमी पडणार आहेत. आचारसंहितेमुळे आम्हाला लोकही कमी करावी लागली. आचारसंहितेमुळे संमेलनाचा कुठलाही राजकीय हेतू नाही, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिका-यांमार्फत निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)