शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिताभंग; ६७ तक्रारी

By admin | Updated: February 16, 2017 02:42 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर जिल्ह्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यासाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असून, उमेदवारांच्या प्रचाराला जोर आल्याने आचारसंहिताभंगाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याअंतर्गत हवेली ३, जुन्नर ४, भोर १, इंदापूर १, मुळशी २ तर वेल्ह्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीमध्ये नंदकुमार किसनराव गोते व शिवांजली शिवाजीराव वाळके यांच्याविरोधात विनापरवानगी हळदीकुंकू, जेवणाचा तसेच होममिनिस्टर कार्यक्रम आयोजित केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीतील भाजपाच्या उमेदवार गौरी गायकवाड याच्यावर विनापरवाना रॅली काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, उमेदवाराचे नाव व काँग्रेस पक्षाचे चिन्ह विनापरवाना गाडीवर वापरल्याने मयूर जवळकर आणि अक्षय कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेल्ह्यामध्ये विनापरवाना बॅनर आणि स्पीकर लावल्याने गणेश प्रकाश कोळपे व दिगंबर दिनकर चोरघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुळशीमध्ये विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याने गंगाराम कुंडलिक मातेरे, शिवाजी राजाराम बुचडे, तृप्ती मदन साळुंखे आणि अविनाश शिंदे तसेच सागर सोपानराव मारणे, मिनानाथ कानगुडेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर येथे गाडीवर विनापरवाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा व पोस्टर लावल्याने राजेंद्र भाकरे, अमोल लोंड व महेश देवकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना कोपरासभा घेतल्याने भोर येथे माऊली विठ्ठल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, जुन्नर येथे दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांमध्ये विनापरवाना झेंडा लावल्याप्रकरणी शैलेश रखमाजी ढोले, राजेंद्र रघुनाथ घोगरे व प्रथमेश प्रसाद थोरवे यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिताभंगाच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने १०७७ हा हेल्पलाईन नंबर दिला असून, त्यावर नागरिकांना आपली तक्रार फोनद्वारे कळविण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)