शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांना सहकार्य

By admin | Updated: May 30, 2017 02:01 IST

सामाजिक बांधिलकी जपणारी व शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारी कॅप्चर सोलर एनर्जी कंपनी आहे. मदनवाडी भागातील शेतकरी कंपनीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : सामाजिक बांधिलकी जपणारी व शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारी कॅप्चर सोलर एनर्जी कंपनी आहे. मदनवाडी भागातील शेतकरी कंपनीच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या सोबत असतील. तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या कंपनीला सहकार्य करू, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.मदनवाडी येथील डोंगर माथ्यावर कॅप्चर सोलर एनर्जी कंपनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भाडेतत्त्वाने घेऊन १५९ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारत आहे. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भरणे यांच्या हस्ते झाला. कंपनीने स्वत:च्या नफ्यात वाढ करीत असताना जमिनीचा मालक असणारा शेतकरी अडचणीत येऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच मदनवाडी गावाला या प्रकल्पातून तयार होणारी वीज मोफत मिळावी. शेतकऱ्यांच्या मुलांना या प्रकल्पात नोकरी द्यावी, अशी मागणी भरणे यांनी केली. जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी उशिरा पोहोचत प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. प्रकल्पाचे चेअरमन राजू भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, मारुतराव वणवे, मनसेचे सुधीर पाटसकर, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, संजय देहाडे, सरपंच सारिका बंडगर, आबासाहेब देवकाते, प्रमोद नरुटे, शरद चितारे, संपत बंडगर उपस्थित होते. गावातील तरुणांना या प्रकल्पात सामावून घेऊ, तर हा प्रकल्प १८ महिने मुदतीत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भरणे यांच्या हस्ते कंपनीचे चेअरमन राजू भोसले यांची तीन देशांचे राजदूत झाल्याबद्दल सत्कार केला. राजेंद्र बलीनवर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. के. भोसले यांनी आभार केले.