शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुटखाबंदीस हवे नागरिकांचे सहकार्य

By admin | Updated: May 3, 2017 23:55 IST

शीतपेयाच्या माध्यमातून आरोग्यास अपाय होऊ नये, यासाठी नागरिक व विक्रेत्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे

 राज्यात गुटखा विक्रीस प्रतिबंध असूनही पुणे विभागात गेल्या वर्षभरात ६ कोटी २ लाखांहून अधिक रकमेचा गुटखा कारवाई करून पकडण्यात आला. मात्र, गुटखाबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूक नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसेच शीतपेयाच्या माध्यमातून आरोग्यास अपाय होऊ नये, यासाठी नागरिक व विक्रेत्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. देसाई म्हणाले, ‘‘अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शीतपेय तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून शहरात निकृष्ट दर्जाच्या शीतपेयांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे विक्रेत्यांकडून स्वच्छतेबाबत काळजी घेतली जात नसल्याने एफडीएकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी ज्युस, कुल्फी, नीरा, लिंबू सरबत, आइस्क्रीम, पेप्सी, कँडीसारख्या शीतपेय पदार्थांची खरेदी परवानाधारकांकडून करणे आवश्यक आहे.’’खाण्यासाठी योग्य असलेल्या आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या अशा दोन प्रकारच्या बर्फाची निर्मिती शहरात केली जाते, असे नमूद करून देसाई म्हणाले, ‘‘पिण्यायोग्य पाण्यापासून तयार केलेल्या बर्फाचा वापर शीतपेयांमध्ये करणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील काही हॉटेलमध्ये पिण्यासाठी अयोग्य असणाऱ्या पाण्यापासून तयार केलेला आणि उद्योगांसाठी उपयुक्त असणाऱ्या बर्फाचा वापर केल्या जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ग्राहकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून शीतपेय विक्रेत्यांनीही आपण कोणत्या बर्फाचा वापर कारतो, हे तपासून घेणे गरजेचे आहे. राज्यात गुटखा विक्रीस बंदी असूनही पुणे विभागात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे साठे पकडले जात आहेत,’’ असे नमूद करून देसाई म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरात पुणे विभागात ६ कोटी २ लाख ५१ हजार ६६२ रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. त्यात एकट्या पुणे जिल्ह्यातील २ कोटी २९ लाख ९९ हजार रुपयांच्या गुटख्याचा समावेश आहे. विभागासह जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गुटख्याची विक्री केली जात असल्यास एफडीएच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती एफडीएला कळवावी. एफडीएचे अधिकारी तत्काळ संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करतील. सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने गुटखाबंदीची अधिक प्रभावी अंमलबजावणी केली जाऊ शकते.’’‘‘पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी प्लॅस्टिकची अंडी विकली जात असल्याची अफवा पसरल्याचे दिसून येत आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनुसार पिंपरी-चिंचवड आणि कोथरूड येथील नागरिकांच्या तक्रारीवरून संबंधित ठिकाणच्या अंड्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. कल्याण डोंबिवली येथेही अशी अफवा पसरली होती. मात्र, अद्याप एकाही ठिकाणी प्लॅस्टिकच्या अंड्यांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,’’ असेही आवाहन देसाई यांनी केले.एफडीएकडून बनावट पाणी बॉटल्स विक्रेत्यांवर व उत्पादकांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणताही परवाना न घेता विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या बॉटल्स घेऊ नयेत. ‘कॅल्शियम कार्बाईड’चा वापर करून कृत्रिम पद्धतीने आंबा पिकवणे गुन्हा आहे. नागरिकांच्या आयोग्याचा विचार करून शहरात विकल्या जाणाऱ्या आंब्यांचे काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी फिरते न्यायालय हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील नागरिकांचा फायदा होत आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी एफडीएचे अधिकारी सदवै कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून अयोग्य व बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची माहिती एफडीएला कळवावी, असेही देसाई म्हणाले.