शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांतून साकारली सीएनजी बाईक

By admin | Updated: May 27, 2017 01:23 IST

येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी सीएनजी बाईक बनवल्याची माहिती प्राचार्य डॉ. गोजे यांनी दिली.

विजय देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्कबेल्हा : येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी सीएनजी बाईक बनवल्याची माहिती प्राचार्य डॉ. गोजे यांनी दिली.मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील मयूर सोनवणे, राजन शर्मा, अजित शिंदे व इरफान शेख या विद्यार्थ्यांनी दुचाकीमध्ये असणाऱ्या कार्बोरेटरमध्ये काही प्रमाणात बदल करून व हवेचा प्रवाह कमी प्रमाणात होण्यासाठी त्याच कार्बोरेटरचा कट सेक्शन वापरून दुचाकींचा पिकअप वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सी.डी. १०० या दुचाकीमध्ये सीएनजी इंधनाचा वापर करून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. एअर फिल्टरकडून पास होणारा हवेचा प्रवाह कट सेक्शन कार्बोरेटरमुळे कमी होतो व दुचाकींचा पिकअप वाढविला जातो. यापूर्वी सीएनजीचे किट हे गिअर नसलेल्या दुचाकीवर बसवून प्रयोग करण्यात आलेले आहेत. पेट्रोल या इंधनाला पर्याय व खचार्ची बचत म्हणून या सीएनजी बाईकचा सर्वसामान्य माणूस विचार करू शकतो. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. अमोल खतोडे, प्रोजेक्ट गाईड प्रा. सचिन निकम यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महाविद्यालय नेहमी अग्रेसर असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे डॉ. दीपराज देशमुख व प्रा. प्रदीप गाडेकर यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.