शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चाईल्ड केअर सेंटर, पाळणाघर, पक्षकारांसाठी ग्रंथालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:43 IST

कौटुंबिक न्यायालयाचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी स्वतंत्र इमारत राज्यात सर्वप्रथम पुण्यात उभी राहिली आहे. चाईल्ड केअर सेंटरसाठी प्रशस्त जागा या इमारतीमध्ये असून पाळणाघरही असणार आहे.

पुणे : कौटुंबिक न्यायालयाचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी स्वतंत्र इमारत राज्यात सर्वप्रथम पुण्यात उभी राहिली आहे. चाईल्ड केअर सेंटरसाठी प्रशस्त जागा या इमारतीमध्ये असून पाळणाघरही असणार आहे. पक्षकारांसाठी बैठक व्यवस्था व ग्रंथालयही असणार आहे. प्रत्येक मजल्यावर टीव्हीची सुविधा केली जाणार असून, कौटुंबिक सलोखाविषयक माहिती त्याद्वारे प्रसारित केली जाणार आहे.कौटुंबिक न्यायालयासाठी उभारण्यात आलेल्या ३ मजली इमारतीचे बांधकाम तब्बल ९ वर्षांनी पूर्ण झाले असून, या इमारतीचे उद्घाटन १२ आॅगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते होणार आहे.पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रगती पाटील, अ‍ॅड. झाकीर मणियार, सचिव अ‍ॅड. आशिष पुरोहित, सहसचिव अ‍ॅड. नीलेश फडतरे उपस्थित होते.शिवाजी जिल्हा न्यायालयासमोरील अन्नधान्य गोदामाच्या ३९ गुंठे जागेवर १५ कोटी रुपये खर्चून अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. प्रशस्त पार्किंग असून ३ लिफ्ट आहेत. इमारतीच्या आवारात लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्यही असणार आहे. या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर सध्या अलका चित्रपटगृहाजवळ काम चालणारे कौटुंबिक न्यायालयनवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे, असे कवडे यांनी सांगितले.फॅमिली कोर्ट अ‍ॅक्ट १९८५मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर कौटुंबिक न्यायालय ही संकल्पना पुढे आली. २७ जानेवारी १९८९मध्ये पुण्यात पहिले कौटुंबिक न्यायालय सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. बांधकामासाठी १० कोटी ५३ लाख रुपये मंजूर झाले होते.भारती विद्यापीठ भवन येथे भाड्याच्या जागेत सातव्या आणि नवव्या मजल्यावर कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज गेली २८ वर्षे सुरु आहे. मात्र सध्याची जागा अपुरी असून, पक्षकारांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत.