शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घरघंटी वाटपावरुन गोंधळ

By admin | Updated: February 10, 2015 23:50 IST

चिपळूण पंचायत समिती : मासिक सभेत सदस्यांची खडाजंगी

अडरे : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मंजूर झालेल्या घरघंटी वाटपावरुन सभेच्या सुरुवातीलाच सदस्य आक्रमक झाले. या विषयावरुन गोंधळ उडाला. चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती समिक्षा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सुचिता सुवार, गटक्षवकास अधिकारी गणेश पिंपळे, अन्य विभागाचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते. सदस्य संतोष चव्हाण यांनी घरघंटीस पिकोफॉल मशीन वाटपाबाबत प्रश्न उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून गेल्यावर्षी २७ घरघंटीसाठी ३ लाख २६ हजार ३७६ निधी मंजूर झाला होता. मागील सभेत घरघंटी पिकोफॉल मशीन या समान वाटपावरुनही गोंधळ निर्माण झाला होता. त्यानुसार मागील सभेतील ठरावाप्रमाणे सदस्यांच्या शिफारशीनुसार लाभार्थींना घरघंटी देणे व नवीन अनुदानातून पिकोफॉल मशीनचे वाटप करणे, अशी मागणी संतोष चव्हाण, अभय सहस्त्रबुद्धे, नंदू शिर्के यांनी केली. नवीन अनुदानानुसार उर्वरित सदस्यांच्या शिफारशीनुसार लाभार्थींना पिकोफॉल मशीनचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.गुहागरहून चिपळूणकडे येणाऱ्या एस.टी. बस बायपास मार्गे येत नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याबद्दल जितेंद्र चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करुन, या बस बाजारपेठमार्गेच नेण्यात याव्यात अशी मागणी केली.अभय सहस्त्रबुद्धे यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करुन, सध्या सुरु असलेल्या सेमी इंग्रजी वर्गाबाबत शासनाचे धोरण चुकीचे असल्याचे सांगितले. दिलीप मोरे यांनी गणेश खिंड ते कापरे रस्त्याची दुरवस्था झाली असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रलंबित कामे त्त्वरित सुरु करण्याची मागणी केली.बायोगॅस प्रकल्पाबाबत ग्रामपंचायतींना ज्याप्रमाणे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते, त्याचप्रमाणे घरकुल योजनेबाबत ग्रामपंचायतींना उद्दिष्ट द्यावे. याबाबत ठराव करावा, अशी मागणी अभय सहस्त्रबुद्धे यांनी केली. आरोग्य, कृषी, पाणी पुरवठा, महावितरण, एस.टी. या विभागांवरही चर्चा झाली. चिपळूण पंचायत समिती सभेत बायोगॅस प्रकल्प, एस.टी. विभाग, शिक्षण, आरोग्य या विषयावर जोरदार चर्चा करण्यात आली. सभेत सदस्यांनी विविध विषयावर चर्चा केली.