पिंपरी : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहर परिसरात गुरुवारी पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागांत पाऊस पडला. मात्र, त्याचे प्रमाण अंशत: असल्याने त्याचा कोणताच परिणाम जनजीवनावर दिसून आला नाही.मागील दहा दिवसांपासून आभाळ ढगांनी व्यापून गेले आहे. मात्र, दमदार पाऊस बरसत नसल्याचा अनुभव शहरासह लगतच्या ग्रामीण भागात येत आहे. गुरुवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले. त्यानंतर काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला. त्यामुळे आता मोसमी पाऊस बरसण्याची शक्यता निर्माण झाली होती. गुरुवारी रात्री तुरळक बरसल्यावर रिमझीम पावसाच्या हलक्या सरींसह शुक्रवार उजाडला. सकाळी ७ व दुपारी १२ च्या सुमारास अनेक भागांत चांगल्या सरींमुळे वातावरण ओलेचिंब झाले. मावळ तालुक्यात बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्याचा शेतीला काही अंशी फायदा होणार आहे. मात्र, अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. (प्रतिनिधी)
ढगाळ वातावरण; काही ठिकाणी सरी
By admin | Updated: June 19, 2015 22:37 IST