शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

घरभाडे भत्ता बंद करून वेतनवाढही थांबविणार

By admin | Updated: December 7, 2015 00:11 IST

शिरूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या जिवावर बेतले आहे.

कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या जिवावर बेतले आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता बंद करून वेतनवाढही रोखण्याचा निर्णय घेण्याबरोबरच त्यांच्यावर कारवाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असा इशारा जिल्हा आरोग्याधिकारी भगवान पवार यांनी दिला आहे.शासनाच्या सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी निवासी राहणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी निवासी न राहता आपल्या सोईच्या ठिकाणीच राहतात. यास जिल्हा आरोग्य विभागही अपवाद असेल तर नवलच म्हणावे लागले असते. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व ज्याठिकाणी आपली नियुक्ती आहे तेथील ग्रामसेवक व सरपंचांकडून गावात रहिवासी असल्याचे बोगस दाखले देत शासनाच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे. या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शिरूर तालुका अध्यक्ष सतीश साकोरे यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितल्यानंतर बोगस दाखल्यांचा हा प्रकार समोर आला आहे. तर तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी महिला रुग्ण दाखल होऊनही डॉक्टर आरोग्य केंद्रामध्ये हजर राहात नाहीत. त्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून चांगली आरोग्य सेवा देण्याच्या प्रयत्नाला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच खो घालण्याचा प्रकार घडत आहे.यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी निवासी राहणे बंधनकारक आहे. जे डॉक्टर व कर्मचारी निवासी राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे भत्ता बंद करून वेतनवाढ थांबवू,’ असे सांगितले व ज्यांनी बोगस रहिवासी दाखले दिले असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)