पिंपरी : जिवंत हातबॉम्ब सव्वा महिना घरात बाळगून विक्रीसाठी ग्राहकाचा शोध घेणारा तरुण विकी सावंत बुधवारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. वाकड पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.विकी हा पंचविशीतील तरुण बेरोजगार आहे. नढेनगरमधील शिवकृपा कॉलनीत अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात तो आई, वडिलांसह भाड्याने राहतो. वडील खासगी कंपनीत नोकरीस आहेत. मोठा भाऊ लग्न झाल्यापासून वेगळा राहतो. हे कुटुंब अगदी साधे आहे. विकी कधीच कोणात मिसळत नव्हता. त्यामुळे त्याचे काय चालले आहे, याबद्दल कोणालाच काही कळत नव्हते. चार-पाच वर्षांपासून हे कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे. यापूर्वी ते पिंपरीगावात राहत होते. विकीच्या चुकीमुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. मुलाने अत्यंत स्फोटक बॉम्ब बाळगला असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)
बॉम्ब बाळगणाऱ्या तरुणास कोठडी
By admin | Updated: September 11, 2015 04:44 IST