शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाकीट संस्कृती बंद करा

By admin | Updated: August 31, 2014 01:03 IST

महाविद्यालयांना भेटी देणा:या ‘एलआयसी ’ कमिटय़ांमुळे (स्थानिक चौकशी समिती) निर्माण झालेली पाकीट संस्कृती बंद व्हावी, यासाठी विद्यापीठाने ठोस यंत्रणा उभी करावी,

पुणो : महाविद्यालयांना भेटी देणा:या ‘एलआयसी ’ कमिटय़ांमुळे (स्थानिक चौकशी समिती)  निर्माण झालेली पाकीट संस्कृती बंद व्हावी, यासाठी विद्यापीठाने ठोस यंत्रणा उभी करावी, अशी मागणी संस्थाचालकांनी कुलगुरूंच्या समोरच केली. 
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शैक्षणिक  संस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विद्यापीठातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे हे होते. या वेळी महाविद्यालय व विद्यापीठ मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड उपस्थित होते.  
स्थानिक चौकशी समितीच्या माध्यमातून सदस्यांना विद्यापीठाकडूनच मानधन निश्चित करावे. म्हणजे पाकीट संस्कृती निर्माण होणार नाही. गुणवत्ता सुधार योजनेंर्तगत मिळणा:या निधीमुळे अनेक महाविद्यालयांना चांगले उपक्रम राबवता येतात. परंतु, ही योजना क्लस्टर पद्धतीत अडकविल्यामुळे या योजनेचा लाभ घेणो अवघड झाले आहे. क्लस्टर पद्धत रद्द करावी, अशी मागणी संस्थाचालकांच्या वतीने करण्यात आली.  
संस्थाचालकांचे प्रतिनिधी डॉ.गजानन एकबोटे म्हणाले, ‘‘मराठा, मुस्लिम आरक्षण आदींमुळे सध्या महाविद्यालयांची शिक्षक  मान्यता (रोस्टर) विद्यापीठाकडून तपासून घेतली जात नाही. परंतु, महाविद्यालयांना शिक्षकांची उणीव भासत आहे. प्राचार्य व प्राध्यापकांच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यास होणारा विलंब दूर करावा. विद्यापीठाच्या विविध समित्यांवर संस्थाचालकांच्या एका प्रतिनिधीला संधी द्यावी. त्यामुळे संस्थाचालकांना आपल्या समस्याही सोडवता येणार आहेत.’’
भविष्यात विद्यापीठाकडून प्राचार्य, प्राध्यापक मान्यता, परीक्षेची कामे, गुणवत्ता सुधारयोजना (क्यूयुपी) यात सुधारणा होतील, असा विश्वास विद्यापीठातर्फे संस्थाचालकांना देण्यात आला.(प्रतिनिधी)
 
संस्थाचालकच 
मागण्यांबाबत उदासीन
4संस्थाचालकांच्या बैठकीस 75 टक्के संस्थाचालकांनी दांडी 
मारली. उर्वरित 25 टक्के संस्थाचालकांनी आपल्याला भेडसावणा:या समस्या स्पष्टपणो मांडल्या. 
4अनेक संस्थाचालकांनी प्राचार्य, प्राध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचारी या बैठकीसाठी पाठविले होते. 
4गुणवत्ता सुधार योजनेच्या सुधारणोचीही संस्थाचालकांकडून मागणी 
 
गुणवत्ता सुधार योजनेपासून विनाअनुदानित महाविद्यालये वंचित राहतात. त्यांच्यासाठी वेगळ्या धोरणाचा विचार करावा, तसेच विद्यापीठात सेंट्रल प्लेसमेंट सेल स्थापन करून विद्याथ्र्याना विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. 
- डॉ.सुधाकर जाधवर, 
वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता