शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहा साखर कारखान्यांची धुराडी बंद

By admin | Updated: February 12, 2017 04:38 IST

जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यात बंद होणाऱ्या साखर कारखान्याने चालू वर्षी उसाअभावी जानेवारी

सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यात बंद होणाऱ्या साखर कारखान्याने चालू वर्षी उसाअभावी जानेवारी महिन्यातच बंद करावे लागले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून ४५ लाख ६६ हजार मे.टन उसाचे गाळप करून ४९ लाख ८१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील घोडगंगा, दौंड शुगर, कर्मयोगी, नीरा भीमा, व्यंकटेश्वर शुगर, अनुराज शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अ‍ॅग्रो, छत्रपती आणि राजगड या साखर कारखान्यांनी आपल्या गाळप हंगामाची सांगता करत कारखान्यांची धुराडी बंद केली आहेत. तर चालू हंगामात भीमा पाटस कारखाना बंद होता. चालू गळीत हंगामात राज्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र घटल्याचे चित्र होते.जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले होते. तर ऊसउत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ, शेतकी विभागाने रात्रंदिवस धडपड केली. कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हताशी धरून बैठक घेत असून रोजची रणनीती आखत आहे. कारखान्यांनी बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्यांला जास्तीत जास्त मिळवता येईल, याकडे कारखान्यांचे लक्ष लागले आहे. ऊसाचे घटलेले क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव याकडे जादा गाळप करण्यासाठी कारखाने धडपडत होते. चालू हंगामात जो कारखाना जादा ऊसाचे गाळप करणार त्या कारखान्याला अधिक नफा होणार त्यामुळे जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी आपल्या जवळील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केली होती. अनेक कारखान्यांनी जागेवरच ‘काटा पेमेंट’ देण्याचे चालू केले आहे. गेल्या हंगामात ऊसउत्पादकांना दोन टप्यात एफआरपी देणारे कारखाना या वर्षी एकरकमी एका टनाला २८०० ते ३ हजार रूपये रोखीने ऊसउत्पादकांना मोजले. तसेच चालू हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने ऊसाचा गोडवा वाढला होता. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर उतारा सव्वा बारावर गेले आहेत. सर्व मिळून ४५ लाख ६६ हजार २९७ में. टन ऊसाचे गाळप करून ४९ लाख ८१ हजार २८३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाऱ्या ‘हाय रीकव्हरी पिरेड’ मध्ये जिल्ह्यातील अनेक कारखाने साखर उताऱ्यात अकरा ते साडे अकरा टककयांवर पोहचले.सध्या सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, भिमाशंकर, संत तुकाराम या पाच कारखान्यांचेच गाळप सुरू आहे. सोमेश्वरने मारली बाजी...सरासरी साखर उताऱ्यातही ११.५२ टक्क्यांचा उतारा ठेवत सोमेश्वरने बाजी मारली आहे. ११.३१ टक्केचा साखर उतारा ठेवत विघ्नहर कारखान्याने दुसरा, तर माळेगाव कारखान्याने ११.२४ टक्के साखर उतारा ठेवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.