शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: July 23, 2015 04:50 IST

चाकण शहराची नियमित साफसफाई नगर परिषदेच्या सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी काम

चाकण : चाकण शहराची नियमित साफसफाई नगर परिषदेच्या सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी काम करणाऱ्या या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कामगारांना आधी ग्रामपंचायत आणि आता नगर परिषद प्रशासनाकडून कोणत्याही आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हातात अक्षरश: प्लॅस्टिकच्या पिशव्या, पायात चप्पल घालून कुठल्याही मास्कशिवाय अत्यंत दुर्गंधी येणारा सर्व प्रकारचा कचरा उचलण्याचे काम हे सफाई कामगार कुठलीही तक्रार न करता करीत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून चाकण शहर व परिसरात आणि लगतच्या वाड्यावस्त्यांमध्ये कचरा साठविण्याकरिता ठिकठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या कमी पडू लागल्या आहेत. परिसरात बहुतांश भागात कचराकुंड्याच ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यांच्या कडेलाच कचऱ्यांचे मोठे ढीग लागतात. कचराकुंड्या असणाऱ्या भागात लहान-लहान कुंड्या लगेचच ओसंडून जातात. बऱ्याच महाभागांना या कुंड्यांमध्ये कचरा टाकण्याऐवजी सोयीच्या ठिकाणी कचरा टाकणे सोपे वाटते. कचरा उचलण्याची नगर परिषदेची यंत्रणा आजही चांगल्या पद्धतीने कार्यान्वित असतानाही नागरिकांकडून होत असलेल्या दुर्लक्षाने खुद्द प्रशासनही मेटाकुटीस येत असून, सफाई कामगारांचे कंबरडे मोडत आहे. शासनाच्या निणर्यानुसार या कामगारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सुविधा पुरवणे प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु, येथील नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सफाई कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तीन महिन्यांतून किमान एक वेळा तपासणी करणे गरजेचे आहे. सफाई कामगारांच्या आरोग्याविषयी तपासणी होत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)