शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुपे ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद

By admin | Updated: March 23, 2016 01:09 IST

शिवकालीन बाजारतळावर एका खासगी मालकाने हक्क सांगून अतिक्रमण केल्याने मंगळवारी (दि. २२) ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. या वेळी सुपेकरांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

सुपे : शिवकालीन बाजारतळावर एका खासगी मालकाने हक्क सांगून अतिक्रमण केल्याने मंगळवारी (दि. २२) ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. या वेळी सुपेकरांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुधवारचा आठवडे बाजार सुरू राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) बाजारतळाची मोजणी पोलीस बंदोबस्तात केली. यावेळी भूमिअभिलेख विभागाचे मंगेश हिलाले, मंडलाधिकारी ए. बी. मोहिते, तलाठी आर. आर. जगदाळे, ग्रामविकास अधिकारी आर. के. चांदगुडे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी जागेच्या हद्द कायम करण्याच्या खुणा येत्या सोमवारी (दि. २८) करण्यात येतील, असे वडगाव निंबाळकरचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांगितले. येथील त्यामुळे उद्याच्या बुधवारी बाजार कुठे भरणार, या मनस्थितीत ग्रामस्थ होते. त्यामुळे सोमवारी ग्रामपंचायतीत एक बैठक घेण्यात आली. या वेळी बाजारतळाच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सुपे गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत झाला होता. या संदर्भात सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले, की आज (मंगळवारी) बाजारतळाची मोजणी करून घेतली आहे. मात्र, येत्या सोमवारी जागेच्या हद्दी कायम करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील बंद बाजारपेठ सुरळीत सुरू करून बुधवारचा आठवडे बाजार भरवावा, अशी माहिती शिंदे यांनी दिली.(वार्ताहर)