शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता दिनाला थंडा प्रतिसाद?

By admin | Updated: November 2, 2014 00:08 IST

स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

पुणो : स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील केवळ बोटावर मोजता येतील एवढय़ाच अनुदानित महाविद्यालयांनी या बाबतचे अहवाल जमा केले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून या अभियानास प्रतिसाद मिळाला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणो शासनाच्या आदेशाला महाविद्यालयांनी  केराची टोपली दाखवल्याची माहितीसुद्धा यामुळे समोर आली आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्थांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून विविध कार्यक्रम आयोजित करणो बंधनकारक होते. 
तसेच स्वच्छ भारत अभियान आणि  राष्ट्रीय एकता दिवस या निमित्त राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल त्याच दिवशी वरिष्ठ कार्यालयास कळवणो अपेक्षित होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानास सुरुवात होऊन तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही केवळ 15 महाविद्यालयांनी यासंदर्भात राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर केला आहे. त्यामुळे या अभियानाचा सर्व क्षेत्रतून मोठा गवगवा केला जात असला, तरी प्रत्यक्षात महाविद्यालयांनी या अभियानात सहभाग घेतला नसल्याचे सहसंचालक कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालांच्या संख्येवरून दिसून येत आहे. 
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वतंत्रता चळवळीमध्ये व त्यानंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक  योगदानाचा गौरव व्हावा तसेच जनतेला त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा मिळावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस 
साजरा करण्याचे आदेश केंद्र 
शासनाने दिले होते. तसेच 
त्यावरील अहवाल त्याच दिवशी 
सादर करण्याचे आदेशही सहसंचालक कार्यालयाकडून दिले गेले होते, 
परंतु आतार्पयत केवळ 7 महाविद्यालयांनीच यावरील अहवाल सादर केले आहेत.(प्रतिनिधी)
 
पुणो विभागीय उच्च शिक्षणासह संचालक कार्यालयांर्तगत 165 अनुदानित महाविद्यालये येतात. त्यातील केवळ 15 महाविद्यालयांनी स्वच्छ भारत अभियानांर्तगत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल पाठविला आहे. तर 7 महाविद्यालयांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राबविलेल्या उपक्रमांची माहिती कळविली आहे. सर्व महाविद्यालयांनी अहवाल तात्काळ सादर करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. 
-  डॉ.सुनील शेटे, उच्च शिक्षण  सहसंचालक,पुणो विभाग.